वैरागड येथे पाणीपुरवठ्यासाठी लगतच्या वैलाेचना नदीवरून जवळपास ४० वर्षांपूर्वी पाणीपुरवठा नळयाेजना कार्यान्वित करण्यात आली. सुरुवातीला गावातील लाेकसंख्या कमी असल्याने व माेजकेच नळकनेक्शन असल्याने नागरिकांच्या फारशा तक्रारी नव्हत्या. परंतु, गेल्या १० वर्षांत गावाची लाेकसंख्या व कनेक्शन वाढले. तेव्हापासून वैरागड येथील पाण्याचे संकट गडद झाले. वाढती लाेकसंख्या व पाण्याची मागणी या कारणांमुळे गावातील नळयोजना कुचकामी ठरू लागली. अर्ध्याअधिक गावाला पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे. वैरागड येथील नळयोजनेची विहीर वैलोचना नदीकाठावर आहे. ज्या ठिकाणी योजनेची विहीर आहे, त्या परिसरातील काही शेतकरी उन्हाळी धान पिकासाठी खड्डे करून शेतीसाठी पाणी शोषून घेतात. त्यामुळे नळयोजनेच्या विहिरीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांपासून पाणीसाठा कमी होतो. विहिरीत पाणीसाठा होत नाही, त्यामुळे तीन हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी पूर्ण भरली जात नाही. परिणामी, गावात पाणीवितरण व्यवस्था बरोबर होत नाही. सध्या गावातील निम्म्या नळधारक कुटुंबांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने त्यांना बाहेरच्या विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याेग्य उपाययाेजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
नवीन आराखड्याचे भिजत घाेंगडे
वैरागड येथे ३०-४० वर्षांपूर्वी कार्यान्वित जुन्या योजनेचा अपुरा पाणीपुरवठा व गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे गोरजाई डोहावर वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रारूप आराखडादेखील मंजूर तयार असताना योजनेचे भिजते घोंगडे आहे. येथील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी जुनी योजना कायम ठेवून नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, हा एकमेव पर्याय आहे. मात्र, येथील पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वैरागडची पाणीसमस्या कायम आहे.
===Photopath===
140421\14gad_1_14042021_30.jpg
===Caption===
वैरागड येथील जुन्या पाणीपुरवठा याेजनेची विहीर.