लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : येथून एक किमी अंतरावर बालमुत्यमपल्ली हे गाव आहे. या गावाच्या रस्त्यावर झुडपे व गवत उगविले आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना चिखल तुडवत पुढचा प्रवास करावा लागतो.बालमुत्यूमपल्ली येथे जवळपास १०० कुटुंब आहेत. या गावाला जाण्यासाठी बसस्थानकावरून रस्ता आहे. त्याचबरोबर पुढे हा रस्ता अनेक गावांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच नागरिक व वाहनांची वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची किमान खडीकरण करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने यासाठी निधी मंजूर केला नाही. परिणामी बांधकाम झाले नाही. सभोवतालच्या शेतकऱ्यांनाही चिखल तुडवतच शेतीवर जावे लागते. या मार्गावर झुडूपे व गवत उगवले आहे. रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी पोलीस पाटील समय्या लंगारी, धर्मय्या दंदेरा, राजू तेरकरी, श्रीकांत लंगारी यांनी केली आहे. याबाबत सरपंच कविता कोडी यांना विचारले असता, पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या बांधकामाला सुरूवात केली जाईल, अशी माहिती दिली.
झुडुपांमध्ये हरवला गावाचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:33 AM
येथून एक किमी अंतरावर बालमुत्यमपल्ली हे गाव आहे. या गावाच्या रस्त्यावर झुडपे व गवत उगविले आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना चिखल तुडवत पुढचा प्रवास करावा लागतो.
ठळक मुद्देचिखल तुडवत मार्गक्रमण : बालमुत्यूमपल्लीच्या रस्त्यावर उगवले गवत व झुडपे