शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

देसाईगंजात आरोग्यविषयक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:35 AM

देसाईगंज : जिल्हा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी व एकात्मिक बालविकास प्रकल्प योजना शहरी भाग देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने ...

देसाईगंज : जिल्हा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी व एकात्मिक बालविकास प्रकल्प योजना शहरी भाग देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.

आराेग्य विभागाचे कर्मचारी व अंगणवाडीसेविका तसेच मदतनीसच्या माध्यमातून कन्नमवार वाॅर्ड, जवाहर वॉर्ड, जुनी वडसा वॉर्ड, किदवाई वॉर्डात फेरी काढण्यात आली. आरोग्यविषयक विविध घाेषणा देऊन जनजागृती करण्यात आली. देसाईगंज शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत गरोदर महिला नोंदणीचे प्रमाण कमी आहे. ते वाढविणे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण वाढविणे, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचे प्रमाण कमी असणे, कुटुंब शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी असणे आदींबाबत फेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सुरुवातीला जनजागृती मोहिमेचा प्रारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक कुंभरे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन मिसार, प्रधानमंत्री मातृवंदना याेजनेच्या जिल्हा सल्लागार अश्विनी मेंढे यांच्या हस्ते करण्यात आला. जनजागृती करुन वाॅर्डफेरीचा समारोप तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. यावेळी सावंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गहाणे, तारकेश्वर अंबादे, नारायण वालदे, उमाकांत दरडमारे, चंद्रकांत चहारे, दिनकर संदोकर, धम्मदीप मेश्राम, सांख्यिकी सहायक प्रियंका पुराम, आर. के. एस. के. समुपदेशक वनिता अढाऊ, क्षयरोग पर्यवेक्षक संदीप हुमणे उपस्थित हाेते. यशस्वीतेसाठी राहुल मेश्राम, नारायण किरमे, भाऊराव वागधरे, श्याम हजारे, तेजस करापे, नामदेव बीडकर, चंद्रकांत मेश्राम यांनी सहकार्य केले.