गडचिराेली : तालुका आराेग्य अधिकारी कार्यालय गडचिराेलीच्या वतीने प्रधानमंत्री मातृवंदना याेजनेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यात १ सप्टेंबरला बुधवारला मातृवंदना सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रधानमंत्री मातृवंदना याेजना कार्यक्रम सप्टेंबर २०१७ पासून सुरू झाला आहे. या कार्यक्रमास आता सप्टेंबर २०२१ ला चार वर्षे पूर्ण हाेत आहेत. त्या निमित्ताने आराेग्य विभागाच्यावतीने गडचिराेली जिल्ह्यात मातृवंदना सप्ताह साजरा केला जात आहे.
मातृवंदना सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. सुनील मडावी यांच्या हस्ते झाले. डाॅ. मडावी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना याेजनेंतर्गत गराेदर मातांना मिळणाऱ्या लाभाबाबत तसेच आहाराची माहिती दिली. आहारात लागणाऱ्या पाेषण तत्त्वाबाबतची माहिती दिली. प्रधानमंत्री मातृवंदना याेजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी आरती रवी साेरते यांनी याेजनेच्या लाभाबाबत आपले मनाेगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन गटप्रवर्तक गेडाम, प्रास्ताविक तालुका समूह संघटक म्हशाखेत्री यांनी केले तर आभार शीतल राठाेड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आराेग्य सहायक काेटरंगे, लिपिक बुरांडे, लेखापाल रामटेके, कुष्ठराेग तंत्रज्ञ दंधे डीईओ भरडकर, लसीकरण संनियंत्रक गेडाम यांच्यासह तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी सहकार्य केले.
यावेळी आराेग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी उपस्थित महिलांना त्यांच्या आहारातील महत्त्व पटवून दिले. गराेदर व स्तनदा मातांनी आपले आराेग्य टिकवून ठेवण्यासाठी पाेषण आहार घेणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले. यावेळी अनेक महिला उपस्थित हाेत्या.
बाॅक्स ....
या विजेत्या महिलांचा गाैरव
मातृवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने आशा स्वयंसेविकांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा या उद्देशाने त्यांच्यासाठी रांगाेळी स्पर्धा, पाककला कार्यक्रम घेण्यात आला. रांगाेळी स्पर्धेत महानंदा भरडकर, प्रतीभा साेनुले, कल्पना गेडाम, साेनाली आक्केवार यांनी बक्षीस मिळविले. पाेषण आहार स्पर्धेमध्ये प्रतीभा पाल, कविता काेटगले यांनी सहभाग घेतल्याबद्दल यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बाॅक्स ...
आठवडाभरात असे हाेणार कार्यक्रम
n १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभरात मातृवंदना सप्ताह आराेग्य विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत असून आठवडाभर विविध कार्यक्रमाचे नियाेजन करण्यात आले आहे.
n मातृवंदना सप्ताहाबाबत सभा आयाेजित करणे, नवीन लाभार्थ्यांची नाेंदणी करणे, लाभार्थ्यांच्या अडचणींचे निवारण करणे, शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांसाठी माेहीम राबविणे, आराेग्य तपासणी करणे, तसेच प्रधानमंत्री मातृवंदना याेजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे या सर्व कामांत याेगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे आदी कार्यक्रम हाेणार आहेत.