गडचिराेली : साेम्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांना ठेवण्यासाठी जिल्हाभरात काेविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. येथे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, काेविड केअर सेंटरमध्ये काम करणारे काही कर्मचारी तसेच काेविड रुग्णालयात कार्यरत कर्मचारी पाहिजे त्या प्रमाणात आता पीपीई कीटचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिराेली जिल्ह्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या १५ ते २० दिवसांपासून सतत वाढत आहे. साैम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी काेविड केअर सेंटर तालुकास्तरावर निर्माण करण्यात आले. जिल्हाभरात ११ काेविड केअर सेंटर असून, ७ काेविड रुग्णालये आहेत. या रुग्णालय व केंद्रांमध्ये डाॅक्टर, परिचारिका, आराेग्य कर्मचारी यांच्यासह काही कंत्राटी कर्मचारी तसेच खासगी कंपनीचे कर्मचारी सेवा देत आहेत. डाॅक्टर व परिचारिका रुग्णांची तपासणी करून औषधाेपचार करतात. आराेग्य कर्मचारीसुद्धा रुग्णांची माहिती घेत असतात. साेबतच स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षकही आपले काम करीत आहेत. पूर्वी पीपीई कीट घातल्याशिवाय काेणतेच कर्मचारी केंद्रांमध्ये प्रवेश करीत नव्हते. मात्र, आता काही कर्मचाऱ्यांची बेफिकिरी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
काही कर्मचारी पीपीई कीट न घालता केवळ मास्क घालून काेविड केअर सेंटरमध्ये प्रवेश करीत आहेत. आतमध्ये जाऊन आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता बळावली आहे.
बाॅक्स....
जिल्ह्यातील काेविड केअर सेंटर - ११
डाॅक्टर - ४६
कर्मचारी - ७८७
काेविडवर उपचार केली जाणारी रुग्णालये - ७
डाॅक्टर - ४२
कर्मचारी - ९७८
काेट.....
काय म्हणतात डाॅक्टर
काेविड केअर सेंटरमध्ये सर्वांना पीपीई कीट व मास्क घालूनच प्रवेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वच जण कीट घालूनच केंद्रामध्ये प्रवेश करतात. आता उष्णतेमुळे काही कर्मचारी थाेड्या वेळासाठी कीट घालत नसतील.
- वैद्यकीय अधिकारी
---------------------
काेराेना वाॅर्डात डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी पीपीई कीटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. आमची चमू रुग्णांची तपासणी करताना पीपीई कीट व मास्क घालूनच सेवा बजावत असते. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
- वैद्यकीय अधिकारी
---------------
काय म्हणतात आराेग्य कर्मचारी
पीपीई कीट, मास्क घालूनच काेविड केअर सेंटरमध्ये कर्मचारी जात असतात. आम्हाला सुद्धा आमच्या जिवाची काळजी आहे. अधिकारी पीपीई कीटशिवाय काेविड केंद्रामध्ये प्रवेश देत नाहीत. त्यामुळे पीपीई कीट घालूनच सेवा बजावावी लागत आहे.
- आराेग्य कर्मचारी
------------------
रुग्णांची माहिती घेण्यासाठी जातानासुद्धा पीपीई कीट घालूनच आम्ही जात असताे. इतर कर्मचाऱ्यांचे आपण सांगू शकत नाही. काेराेनाबाधित रुग्णांशी ज्या-ज्या ठिकाणी संपर्क येताे, त्या ठिकाणी कीट व मास्कशिवाय प्रवेश करीत नाही.
- आराेग्य कर्मचारी
-----------------
एखाद्या वेळेसच एखादा कर्मचारी पीपीई कीटशिवाय आतमध्ये येत असताे. मात्र, दाेन मास्क व हेल्मेटसारखी टाेपी घालून बरेच कर्मचारी असतात. तपासणीदरम्यान डाॅक्टर व कर्मचारी कीट घालून येत असतात.
- रुग्ण
--------------
काेविड केअर सेंटरमध्ये काही सुरक्षारक्षक केवळ मास्क घालून असतात. डाॅक्टर व कर्मचारी पीपीई कीट घालतात. दरम्यान, काेण डाॅक्टर आहे व काेण परिचारिका हे ओळखून येत नाही.
- रुग्ण