दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जीवनशैलीत होत असलेल्या बदलामुळे दिवसेंदिवस हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या नोंदीनुसार मागील वर्षी जिल्हाभरात हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या केवळ १७६ एवढी होती. ती यावर्षी ७३३ पर्यंत पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.नागरिकांचे जीवनमान उंचावत चालले आहे, तसतसा हृदयरोगाचा धोका वाढत चालला आहे. ३० वर्षानंतर उच्च रक्तदाब, मधूमेह कर्करोग हे आजार आढळून येत आहेत. मानसिक ताणतणाव यामुळे हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शरीरात चरबीचे प्रमाण वाढल्याने हृदयरोग व उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते. वेळेवर उपचार न झाल्यास उच्च रक्तदाबामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो.३० वर्षावरील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. छातीत दुखणे, धडधडणे, चालताना दम येणे, धापा टाकणे, घाम येणे, डोके दुखणे, वारंवार चक्कर येणे आदी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ जवळपासच्या रूग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.हृदयरोग टाळण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. तंबाखू, दारू व इतर व्यसनांपासून दूर राहावे, जास्तीचे मिठ, तेलकट पदार्थ खाणे टाळावे, दरदिवशी हलका व्यायाम, प्राणायम करावे, ताणतणावापासून दूर स्वत:ला ठेवण्याचा प्रयत्न करावा. हिरव्या पाल्याभाज्यांचा समावेश करावा. रागावर नियंत्रण ठेवल्यास हृदयरोगावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.जनजागृतीपर मार्गदर्शन शिबिर२९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदयरोग दिन, १ आॅक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व १० आॅक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन आहेत. या सर्वांचे औचित्य साधून हृदयरोग, मानसिक आरोग्य, कर्करोग, तंबाखू नियंत्रण आदींबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. याचा शुभारंभ २९ सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात केला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.नोंदणीनंतर रूग्णांकडे विशेष लक्षएखाद्या व्यक्तीला हृदयरोग असल्याचे निदान झाल्यानंतर त्याची नोंद असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केली जाते. त्याचबरोबर गंभीर स्थितीतील रूग्ण आंतर रूग्ण विभाग किंवा अतिदक्षता विभागात भरती झाल्यानंतर त्याचीही नोंद केली जाते. नोंद झाल्यानंतर संबंधित रूग्णाला जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय किंवा जिल्हा सामान्य रूग्णालयात आवश्यकतेनुसार तपासणीसाठी बोलविले जाते. या रोगाच्या औषधी सर्वच शासकीय रूग्णालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. सोनाली कुंभारे यांनी दिली आहे.
वर्षभरात जिल्ह्यात चार पटींनी वाढले हृदयरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:27 AM
जीवनशैलीत होत असलेल्या बदलामुळे दिवसेंदिवस हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या नोंदीनुसार मागील वर्षी जिल्हाभरात हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या केवळ १७६ एवढी होती.
ठळक मुद्दे७३३ रूग्णांची नोंद : व्यसनाधिनता आणि जीवनशैलीतील बदलाने वाढतेय प्रमाण