ठळक मुद्देबाजारपेठा, शाळा प्रभावितजनजीवन अस्तव्यस्त
रमेश मार्गोनवारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: शनिवारपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोलीतील सुमारे १०० गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. हेमलकसा-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीवर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.भामरागड तालुक्याशी संपर्क ठेवता येणारा एकमेव पूल पाण्याखाली गेल्याने किमान १०० गावांचा संपर्क तुटला आहे. संततधारेमुळे शाळा, महाविद्यालयांसह बाजारपेठाही प्रभावित झाल्या आहेत. गावकऱ्यांना घराबाहेर पडणे अवघड झाले असून, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.