भामरागड (गडचिरोली) - शनिवारी दूपारपासून भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पर्लकोटा नदीचे पात्र फुगले आहे. रात्री 10 वाजताच्या सुमारास नदीचे पाणी पुलावर चढल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे पावसाचे पाणी नदीत वाहून जात नसल्याने आणि नदीचे पाणी गावात शिरण्याची स्थिती निर्माण झाल्याने गावकरी सतर्क झाले आहेत.
पुलावर पाणी चढल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाला आहे. आताच्या स्थितीत पर्लकोटा नदीच्या पुलावर जवळपास 2 फूट पाणी चढले आहे. नदीकाठी असलेल्या घरात पाणी शिरले आहे. हे पाणी गावात शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने काही दुकानदारांनी दुकानातील सामान हलवणे सुरू केले आहे.