लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विदर्भात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जूनच्या दुसºया आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात ५२.२ मिमी पाऊस झाला. त्यात ३ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १२६.८ मिमी पाऊस झाला आहे.गेल्या २४ तासात सर्वाधिक १३२.२ मिमी पाऊस मुलचेरा तालुक्यात झाला. याशिवाय चामोर्शी तालुक्यात १०४.९ मिमी तर अहेरी तालुक्यात ७१.७ मिमी पाऊस झाल्याने शेताच्या बांध्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प पडली आहेत. काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे. दरम्यान मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. आलापल्ली परिसरात सायंकाळी जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. सध्या शेतातील बांध्यात पाणी साचल्यामुळे रोवणीपूर्व कामे थांबवावी लागली. पºहे आणि आवत्या टाकण्याच्या कामाला काही शेतकºयांनी सुरूवात केली असली तरी पावसामुळे हे काम थांबले आहे. आता तीन-चार दिवस पावसाने उसंत घेतल्यास शेतीच्या कामांना वेग येणार आहे. चामोर्शी, मुलचेरा तालुक्यामध्ये कापूस व सोयाबिन पिकाच्या पेरणीला वेग येणार आहे.या पावसामुळे अनेक रस्त्यांच्या कामाचा दर्जा उघड झाला. निकृष्ट रस्त्यांवरचा डांबरी थर निघाल्याने रस्ते खड्डेमय दिसू लागले आहेत. तसेच काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. काही गावांना रात्र अंधारातच काढावी लागली.
तीन तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:41 PM
विदर्भात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जूनच्या दुसºया आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात ५२.२ मिमी पाऊस झाला.
ठळक मुद्देवीज पुरवठा खंडित : दमदार पावसाने शेतकरी लागले कामाला