ठळक मुद्देशेतकऱ्यांची दैना
श्रीधर दुग्गीरालापाटीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडविली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरातील सर्व नाल्यांना पूर आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कमलापूर रेपनपल्ली नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असून हा मार्ग कालपासून बंद आहे. परिणामी शेकडो लहान गावे, वस्त्या या संपर्कापासून तुटल्या आहेत. कालपासून सुरू झालेला पाऊस सध्याही हे वृत्त लिहिस्तोवर जोरात सुरू होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रोवणी केलेली रोपे वाहून गेली आहेत तर काही शेतात पाणी साठून ती सडण्याच्या मार्गावर आहेत.