ठळक मुद्देमिरची व धान झाले ओलेचिंब
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तडाखेबंद अवकाळी पावसाने गडचिरोली जिल्ह्यातील मिरची व धानाच्या पिकाला जबरदस्त तडाखा दिला आहे. कापणीला आलेला व कापून ठेवलेल्या धानाच्या ढिगाऱ्यांवर पाऊस कोसळल्याने ते ओलेचिंब झाले आहेत. शेतात कापणीसाठी असलेली व शेतातच कापून ठेवलेली मिरचीही पार भिजून ओली झाली आहे. या धान व मिरचीचे आता काय करायचे असा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे. एकीकडे कोरोनामुळे सगळे जग बंद झालेले आणि अशात पावसाने हातचे पीकही नेल्याने बळीराजासमोरचे संकट अधिक गडद झाले आहे. कृषी विभागाने या नुकसानाची पाहणी करुन भरपाई दिली जावी अशी मागणी होत आहे.