शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

गरजूंच्या मदतीसाठी वीरपत्नीची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 5:00 AM

नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्यांनी शिवराय सामाजिक संस्थेमार्फत मदत वाटपाची इच्छा व्यक्त केली.

ठळक मुद्देसामाजिक दायित्व; १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला.नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्यांनी शिवराय सामाजिक संस्थेमार्फत मदत वाटपाची इच्छा व्यक्त केली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा प्रस्ताव लगेच मान्य करत गडचिरोलीजवळील नवेगाव (मुरखळा) आणि दिभना (माल) या गावातील १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला.कामे बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गरीब, मजूर, निराधार, अपंग, निराधार विधवा महिला अशांची निवड केली. त्यांना तांदूळ, डाळ, तेल, तिखट, मीठ, चहाचे साहित्य आणि भाजीपाला अशा विविध जीवनोपयोगी वस्तू देण्यात आल्या.या कामात त्यांना शिवराय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परमानंद पुन्नमवार सचिव सुरज बोरकुटे, भास्कर पेटकर, आकाश पोहनकर, श्रेयस जुमनाके, शुभम देवलवार आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. सदर साहित्य वाटप करताना दिभना (माल) गावचे सरपंच उमाकांत जुमनाके, ग्रामसेवक वासंती देशमुख तसेच नवेगाव (मुरखळा) गावचे ग्रामपंचायत सदस्य राजू खंगार व इतर नागरिक आदी उपस्थित होते.गरजवंतांबद्दल तळमळअनेक गावांमध्ये मोलमजुरी करणाºयांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हाती पैसा नाही, घरात अन्नधान्य नाही, आणि हाताला कामही नाही. त्यामुळे जगावे कसे या विवंचनेत असलेल्या गोरगरीबांना सरकारी यंत्रणेकडून मिळणारी मदत आणि सामाजिक संस्था, दानशूर नागरिकांकडून वस्तूरूपाने मिळणारी मदत मोलाची ठरत आहे. अजूनही अशा मदतीची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक