लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची आश्रमशाळेत शिकत असलेल्या सुशिल नवलसिंग नैताम या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाला पाच लाख रूपयांची मदत द्यावी, त्याचबरोबर आश्रमशाळेत सोयीसुविधा पुरवाव्या, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी यांनी साहायक प्रकल्प अधिकारी काळे यांच्यामार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.सुशिल नैताम हा दहाव्या वर्गात शिकत होता. सुशिल हा वºहांड्यात जेवण करीत असतानाच विषारी सापाने चावा घेतला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, मृतक विद्यार्थ्याच्या कुटुंबाला पाच लाख रूपये आर्थिक मदत द्यावी, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनावश्यक सोयीसुविधा पुरवाव्या, शौचालय बांधावे, डीबीटीअंतर्गत मुलाच्या खात्यात रक्कम जमा करावी, चार वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम व्याजासह तत्काळ द्यावी, पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत दर महा विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी, आदी मागण्या सहायक प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. याच निवेदनाची प्रत कोरचीचे तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे.सदर निवेदन जिल्हाधिकारी, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांनाही पाठविले आहे. तीन दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास शाळेतील विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व वसतिगृहातील विद्यार्थी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून दिला आहे.निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी यांच्यासह मदन चमरू कुरचाम, अजय कल्लो, बाबुराव मडावी, रूद्रप्रकाश हलामी, रमेश कोरचा, मोहन कुरचाम, प्रेमलाल तुलावी, कैलास दर्रो, पुरूषोत्तम हलामी, सरदार होळी, उत्तम आतला आदी उपस्थित होते.
सुशील नैतामच्या कुटुंबाला मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:50 PM
कोरची आश्रमशाळेत शिकत असलेल्या सुशिल नवलसिंग नैताम या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला.
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू प्रकरण