चामाेर्शी : तालुक्यातील गाैरीपूर येथील अविनाश हरविलास मजुमदार या ५९ वर्षीय व्यक्तीचा ३१ डिसेंबरला चामाेर्शी येथे अपघाती मृत्यू झाला. पाेलिसांच्या भूसुरुंगराेधक वाहनाने धडक दिल्याने त्यांना जीव गमवावा लागला हाेता. मजुमदार यांच्या निधनाने कुटुंबावर माेठे संकट काेसळले. त्यामुळे त्यांच्या अपघाती निधनाची सखाेल चाैकशी करून कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी निखिल भारत बंगाली, उदबास्तू समन्वय समितीने उपविभागीय पाेलीस अधिकारी ढाेले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. शहरातील गर्दी पाेलीस याेग्यप्रकारे नियंत्रित करीत नसल्याचेही नियाेजनात म्हटले आहे. मजुमदार कुटुंबाला लवकर मदत द्यावी, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे प्रदेश सचिव बिधान बेपारी, काेषाध्यक्ष सुभाष सरकार, रतन सरकार, कमलेश गाईन, रनेन मंडल, नमिता राॅय, शैलेंद्र शिकारी, सुरेश मजुमदार, अमरेश शील, रूपचंद कीर्तिनिया, प्रेमानंद मलीक यांनी दिला.
‘त्या’ पीडित कुटुंबाला मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:35 AM