शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अन् तिच्या जिद्दीला व परिश्रमाला मिळाले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:34 AM

महेंद्र रामटेके लाेकमत न्यूज नेटवर्क आरमाेरी : मनात काहीतरी शिकण्याची जिद्द आणि त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास या जगात काहीच ...

महेंद्र रामटेके

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमाेरी : मनात काहीतरी शिकण्याची जिद्द आणि त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास या जगात काहीच अशक्य नाही. आज विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रगती केल्यामुळे महिला आकाशात उंच भरारी घेऊ लागल्या. विविध क्षेत्रांत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला गरुडझेप घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटविताना दिसत आहेत. मग, ते क्षेत्र कोणतेही असू द्या, महिला पुरुषांपेक्षा तसूभरही कमी नाही. आजपर्यंत पुरुषच ट्रॅक्टर व इतर सर्व वाहने चालविताना आपण बघितले आहे. पण, आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील मयूरी मातेरे ही विद्यार्थिनी याला अपवाद ठरली आहे. तिच्या मनातील जिद्द आणि परिश्रमासमोर आकाशही ठेंगणे झाले आहे. ग्रामीण भागातील ही युवती स्वतः ट्रॅक्टर चालवून घरची शेतीची नांगरणी, वखरणी व इतर कामे करीत असल्याने तिच्या धाडसाचे आणि कर्तबगारीचे कौतुक केले जात आहे.

सद्य:स्थितीत शेती व्यवसायात दरराेज एक नवे आव्हान व संकट येतच आहे. मात्र, त्या संकटांना डगमगून न जाता जे ठामपणे पाय रोवून उभे राहतात, तेच चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात. आजचे शिक्षण घेणारी मुले व मुली ही शेतीकडे दुर्लक्ष करून नोकरीच्या मागे लागताना दिसत आहेत. मुळातच शेती हा विषयच त्यांच्या डोक्याबाहेरचा असतो. वडिलांना शेतीच्या कामात साधी मदतही करताना दिसत नाही. अशा मुलामुलींसाठी भूमिकन्या मयूरी ही एक आदर्श ठरणारी आहे. तालुक्यातील पाथरगोटा येथील मयूरी यशवंत मातेरे ही शिक्षणासाेबतच घरच्या शेतीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे. घरचा ट्रॅक्टर स्वतः शेतात चालवून शेतीची मशागत करीत आहे. मयूरीच्या घरी सात एकर शेती आहे. वडील हे आरटी वर्कर म्हणून आरोग्य विभागात काम करतात, तर आई महिला आर्थिक विकास महामंडळातच व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे. मयूरीला एक मोठी बहीण असून ती सुद्धा शिक्षण घेत आहेत. मयूरी ही शिक्षणात अतिशय हुशार असून ती बारावी विज्ञान शाखेतून ६४ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिला शेतीसोबत आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याने नागपूर येथील लता मंगेशकर नर्सिंग कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला आहे. मयूरी ही सर्वगुणसंपन्न असलेली युवती असून आजपर्यंत अनेक क्षेत्रांत तिने नाव चमकविले आहे. तिचा अनेकदा सत्कारही झाला आहे. मयूरीच्या घरी ट्रॅक्टर आहे, त्यामुळे तिला ट्रॅक्टर चालविण्याची खूप जिद्द होती. दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे ट्रॅक्टर चालविण्यासाठी ड्रायव्हर होता. शेतात जेव्हा ट्रॅक्टरने नांगरणी व इतर मशागतीची कामे व्हायची, तेव्हा आपणही ट्रॅक्टर चालविण्यास शिकले पाहिजे, अशी तिची इच्छा व्हायची. मुलीने ट्रॅक्टर चालवायचा, हे शिकणे ही न पटणारी बाब होती. पण, तिने ट्रॅक्टर चालवायला शिकण्याचे धाडस केले आणि यासाठी तिच्या आई-वडील व आजी-आजोबांनी प्रोत्साहन दिल्याने तिच्या इच्छेला बळ मिळाले.

बाॅक्स....

मुलाची उणीव कधीच भासली नाही

मला दोन्ही मुली आहेत, पण त्या मला मुलासारख्याच आहेत. त्यामुळे मुलाची कधीच उणीव भासली नाही. तिला ट्रॅक्टर शिकण्याची जिद्द होती आणि तिने ती पूर्ण केली. रोवणीसाठी चिखल करण्याचे कठीण काम असतानाही ती काम करीत आहे. तिचा मला अभिमान वाटतो. पुढे ज्या-ज्या क्षेत्रातील काम करेल, त्या क्षेत्रात ती नक्कीच यशस्वी होईल आणि संधीचे सोने करेल, असा आशावाद मयूरीची आई यामिनी मातेरे यांनी व्यक्त केला.

बाॅक्स...

चालकाकडून घेतले ड्रायव्हिंगचे धडे

दादा, ‘मला ट्रॅक्टर चालविणे शिकव रे’, असे म्हणून चालकाकडून ट्रॅक्टर चालविण्याचे धडे घेतले. आता ती गेल्या दोन वर्षांपासून ट्रॅक्टर स्वतः चालवून घरच्या शेतीची मशागत करीत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकावर होणारा खर्च मयूरीमुळे बचत झाला आहे. पावसाळी आणि उन्हाळी धानपिकाची नांगरणी आणि चिखलणी ती स्वतःच ट्रॅक्टरद्वारे करीत आहे. लाॅकडाऊनमुळे कॉलेज बंद राहिल्यामुळे तिला खूप वेळ मिळाला आणि या वेळेचा तिने चांगलाच सदुपयोग केला आहे.