लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानात आतापर्यंत शहीद झालेल्या आणि विशेष कामगिरी करत विविध पदके पटकावणाऱ्या पोलीस दलाची शौर्यगाथा सांगणारे ‘शौर्य स्थळ’ नक्षलविरोधी लढ्यासाठी सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभारलेल्या या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.शहीद कुटुंबियांच्या हस्ते रविवारी या शौर्य स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांनी आवर्जुन भेट द्यावी असे आवाहनही याप्रसंगी पो.अधीक्षक बलकवडे यांनी केले.जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबवताना आतापर्यंत २१२ जवानांनी बलीदान दिले. त्या जवानांचे शौर्य व पराक्रम, त्यांनी केलेला त्याग कायम स्मरणात राहावा आणि त्यांच्या आठवणी गडचिरोली पोलीस दलातील जवानांना प्रेरणा देत राहाव्या यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून ‘शौर्य स्थळ’ या वास्तुची उभारणी करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, सहायक पोलीस अधीक्षक मुमक्का सूदर्शन यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबिय उपस्थित होते.असे आहे हे ‘शौर्य स्थळ’शौर्य स्थळ या वास्तूमध्ये नक्षलविरोधी लढ्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याचे व अप्रतिम कामगिरीचे लेखन करण्यात आले असून शहीद जवानांच्या गाथा सांगणाऱ्या चित्रफितीही तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक, राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले आहे त्यांच्या नावांचा उल्लेखही या ठिकाणी करण्यात आला आहे. गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसह प्रत्येक घटकासाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजनांनाही शौर्य स्थळामध्ये स्थान देण्यात आले आहे.पोलीस रुग्णालयाचे नुतनीकरणपोलीस दलाकरिता असलेल्या रुग्णालयाचे नुतनीकरण आणि बहुउद्देशिय चिकित्सा केंद्राचा उदघाटन सोहळा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते रविवारी पार पडला. या रुग्णालयात रुग्णासाठी विविध सोयी सुविधा एकाच ठिकाणी प्राप्त होण्यासाठी आणि नक्षलविरोधी अभियान राबवणाऱ्या जवानांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी अत्याधुनिक मशिनरीसह तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सदैव सेवेत राहणार आहे. त्याचा फायदा जिल्हाभरातील पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे.
नक्षलविरोधी लढ्यासाठी ‘शौर्य स्थळ’ प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 5:00 AM
जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबवताना आतापर्यंत २१२ जवानांनी बलीदान दिले. त्या जवानांचे शौर्य व पराक्रम, त्यांनी केलेला त्याग कायम स्मरणात राहावा आणि त्यांच्या आठवणी गडचिरोली पोलीस दलातील जवानांना प्रेरणा देत राहाव्या यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून ‘शौर्य स्थळ’ या वास्तुची उभारणी करण्यात आली.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षक बलकवडे : जिल्हा पोलीस दलाची शौर्यगाथा सांगणाऱ्या इमारतीचे शहीद कुटुंबीयांच्या हस्ते उद्घाटन