दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात आणखी तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले असून त्यापैैकी १३० डी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग अहेरी-आलापल्ली-भामरागड-बिनागुंडा व पुढे छत्तीसगड राज्यातील नारायणपुरला जोडणार आहे. या मार्गामुळे भामरागड तालुक्यातील रस्त्यांची समस्या मार्गी लागण्यास फार मोठी मदत होणार आहे.देशाच्या विकासात रस्ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख समस्यांमध्ये रस्ते ही एक समस्या आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकही राष्टÑीय महामार्ग नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीची नेहमीच कमतरता राहत असल्याने येथील राज्य महामार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले राहत होते. रस्त्यांची समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने चंद्रपूर-मूल-गडचिरोली-सावरगाव व साकोली-गडचिरोली-सिरोंचा हे दोन मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले. या मार्गांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ३० डिसेंबर २०१६ रोजी पार पडला. दोन्ही मार्ग शेकडो किमी अंतराचे आहेत. या दोन मार्गामुळे जिल्ह्याचा अध्यापेक्षा अधिक भाग व्यापला जात आहे.या दोन मार्गाच्या भूमिपूजनानंतर केंद्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यातून जाणारे आणखी तीन नवीन महामार्ग मंजूर केले आहेत. त्यामध्ये १३० डी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग अहेरी-आलापल्ली-भामरागड-बिनागुंडा व पुढे छत्तीसगड राज्यातील नारायणपुरला जोडणार आहे. दुसरा राष्ट्रीय महामार्ग ५४३ क्रमांकाचा आहे. तो मध्यप्रदेश राज्यातील दिंडोरी-शहाडो-बालाघाट-गोंदिया-आमगाव- देवरी मार्गे कोरची व कुरखेडाला जोडणार आहे. तिसरा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर-बामणी-गोंडपिंपरी मार्गे आष्टीला जोडणार आहे. त्याचा क्रमांक ३५३ बी आहे. या तीन नवीन मार्गामुळे गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापला जाणार आहे. विशेष म्हणजे, भामरागड तालुक्यात नक्षलवादाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे या तालुक्यात मार्ग निर्मितीचे काम करताना शासनाला फार मोठी अडचण निर्माण होत होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा असल्याने पोलीस संरक्षणात सदर मार्ग निर्मिती केली जाणार असल्याची शक्यता आहे.गडचिरोली-आष्टी मार्गाचे काम लवकरचराष्ट्रीय महामार्गांची लांबी शेकडो किमी असल्याने महार्गाचे बांधकाम करण्याच्या दृष्टीने महामार्ग विभागाने टप्पे पाडले आहेत. गडचिरोली-आष्टी हा एक टप्पा आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ३१४ कोटी रूपये मंजूर केले आहेत. या कामाची निविदा काढण्यात आली आहे. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. सावरगाव- चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गातील गडचिरोली-मूल हा एक टप्पा आहे. या टप्प्यातील मार्गाचे काम सुरू आहे. या टप्प्यातील एकूण ४२ किमी पैैकी ६ किमीवर डांबर तर उर्वरित ३६ किमी सिमेंट काँक्रिटीकरण राहणार आहे. सदर मार्ग टू- लेन राहणार आहे. सावली तालुक्यातील हिरापुरजवळ टोल प्लाझा बसविला जाणार आहे.संपूर्ण मार्गांच्या निर्मितीसाठी जवळपास १ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. निधी उपलब्ध होण्यावर कामाची प्रगती राहणार आहे.शहरात २४ मीटरचा रोडमूल मार्गावरील नवेगाव येथील बोरकर पेट्रोलपंप ते धानोरा मार्गावरील स्कूल आॅफ स्कॉलर शाळेपर्यंत फोरलेन मार्ग राहणार आहे. शहरातून २४ मीटरचा मार्ग राहणार आहे. संपूर्ण मार्ग सिमेंंट काँक्रिटचा राहिल. शहराच्या बाजूने १२ किमीचा बायपास तयार करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. मात्र केंद्र शासनाने अजुपर्यंत मंजूरी दिली नाही.
महामार्गाने जोडणार बिनागुंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:05 PM
केंद्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात आणखी तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले असून त्यापैैकी १३० डी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग अहेरी-आलापल्ली-भामरागड-बिनागुंडा व पुढे छत्तीसगड राज्यातील नारायणपुरला जोडणार आहे.
ठळक मुद्देनव्या तीन राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी : अहेरी-बिनागुंडा, दिंडोरी-कोरची, बल्लारपूर-आष्टी मार्गांची भर