लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातच वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने येथे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना श्वसनाचे व इतर आजार हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने जे-जा करीत असतात. मात्र, आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण लक्ष्मी गेटसमोरून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गानेसुद्धा वाहनांची व पादचारी लाेकांची प्रंचड गर्दी दिसून येते. घोटवरून चामोर्शीमार्गे येणाऱ्या सर्व दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन याच मार्गाने असते. अनेक वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवत असल्याने वाहतुकीस अडथळा येताे. वाहतुकीची काेंडी साेडविणे व धुळीच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी संबंधित विभागाने उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी हाेत आहे.
एकेरी वाहतूक अडचणीचीचामोर्शी शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची रहदारी वाढल्याने वाहतूक काेंडीचा प्रश्न निर्माण हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर ताेडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, अवजड वाहने दिवस-रात्र ये-जा करीत असल्याने अपघाताचा धाेका आहे.