लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : घरोघरी भाजी विक्री करताना लपून-छपून लोकांना खर्रा विक्री करणाऱ्यास जवेली येथील पोलीस पाटलाने बुधवारी रंगेहात पकडले. त्याच्याकडून काही खर्रे जप्त करून ग्रामपंचायतमार्फत त्याच्यावर दंडही आकाराला. सचिन बक्त असे विक्रेत्याचे नाव आहे. अशा प्रकारे खर्रा विक्री होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.लॉकडाऊनमुळे सध्या गावांतील भाजीबाजार बंद आहे. त्यामुळे अनेकांनी दुचाकीवरून गावांमध्ये घरोघरी जाऊन भाजी विकणे सुरू केले आहे. मुलचेरा तालुक्यातील श्रीरामपूर येथील सचिन बक्त हा इसमही दुचाकीवरून एटापल्ली तालुक्यातील गावांमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. पण बुधवारी जवेली येथे घरोघरी भाजी विक्री करताना तो लपून-छपून खर्राही विकत असल्याचे पोलीस पाटील मासू उसेंडी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्यास अटकाव करून ग्राम सचिव गेडाम यांना याबाबतची माहिती दिली. त्या इसमाची झडती घेतली असता त्याचाजवळ ६५ खर्रे सापडले. ते ताब्यात घेत त्याच्यावर एक हजार रुपये दंड आकारला.भाजीविक्री व्यवसायाच्या आड अशाप्रकारे खर्राविक्री केल्यास कोरोना संसर्ग घरपोच येण्याचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर शासकीय नियमाचाही भंग होत आहे.बुर्गीत तिघांवर दंडएटापल्ली मुक्तिपथ तालुका चमूने बुधवारी ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच व पोलिसांच्या सहकार्याने बुर्गी गावातील सहा किराणा दुकानांची तपासणी केली. यावेळी तीन दुकानांमधून तब्बल सहा हजारांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. या तीनही विक्रेत्यांवर ग्रामपंचायतने एक हजार रुपये तर पोलिसांनी कोटपा कायद्यांतर्गत २०० असा एकूण प्रत्येकी १२०० रुपये दंड आकाराला.
भाजी विक्रीआड खर्ऱ्याची घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 5:00 AM
लॉकडाऊनमुळे सध्या गावांतील भाजीबाजार बंद आहे. त्यामुळे अनेकांनी दुचाकीवरून गावांमध्ये घरोघरी जाऊन भाजी विकणे सुरू केले आहे. मुलचेरा तालुक्यातील श्रीरामपूर येथील सचिन बक्त हा इसमही दुचाकीवरून एटापल्ली तालुक्यातील गावांमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. पण बुधवारी जवेली येथे घरोघरी भाजी विक्री करताना तो लपून-छपून खर्राही विकत असल्याचे पोलीस पाटील मासू उसेंडी यांच्या निदर्शनास आले.
ठळक मुद्देजवेली येथील प्रकार : ग्रामपंचायत प्रशासनाने केली दंडात्मक कारवाई