लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद असल्यामुळे चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मागील वर्षी राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळता आले. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील राजाराम केंद्रातील छल्लेवाडा शाळेतील उपक्रमशील शिक्षक सूरजलाल येलमुले यांनी या उपक्रमाची माहिती उपस्थित मान्यवरांना करून दिली. घरोघरी शाळेचे उद्घाटन वसंत चव्हाण यांनी केले. यासाठी सर्वप्रथम श्रृती व्येंकटी पोरतेट यांच्या घरून सुरुवात करण्यात आली. प्रथम श्रृतीला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी श्रृतीचे वडील व्येंकटी पोरतेट, आई शांता पोरतेट तसेच भाऊ, बहीण उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सामा सिडाम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत चव्हाण, मनीषा ताटीवार, कल्पना रागिवार, समय्या चौधरी, सूरजलाल येलमुले, बाबूराव कोडापे, राजेंद्र दहिफळे, मुसली जुमडे, आदी पालक उपस्थित होते. या उपक्रमाला पालक व गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत शिक्षकांचे कौतुक केले आहे.
===Photopath===
290621\25401817-img-20210629-wa0065.jpg
===Caption===
जि.प.उच्च प्राथ.शाळा, छल्लेवाडा येथे घरोघरी शाळा या शैक्षणिक उपक्रमाला सुरुवात.