लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने डायट गडचिरोली नावाचा ब्लॉग तयार केला असून या ब्लॉगवर विद्यार्थ्यांसाठी दरदिवशी गृहपाठ उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी त्यानुसार अध्ययन करावे, असे आवाहन डायटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी केले आहे.कोरोनामुळे देशभरातील शाळा शैक्षणिक सत्र संपण्याच्या पूर्वीच बंद करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शाळा नेमक्या कधी सुरू होतील, याची निश्चित तारीख नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने आॅनलाईन शिक्षणावर विशेष भर दिला आहे.बहुतांश भागात इंटरनेटची सुविधा आहे. तसेच बहुतांश पालकांकडे स्मार्ट फोन सुद्धा उपलब्ध आहे. या फोनच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकता यावे, यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने ब्लॉग तयार केला आहे. या ब्लॉगवर प्रत्येक इयत्तेसाठी दरदिवशी स्वतंत्र गृहपाठ दिला जाईल.हा गृहपाठ पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. जेणेकरून विद्यार्थी घरीच सुरक्षित राहून अभ्यास करू शकतील, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील यांनी केले आहे.छोटी पुस्तकेही उपलब्धडायटच्या ब्लॉगवर विद्यार्थ्यांसाठी गोष्टींची लहान पुस्तके, विविध मासिके, विविध बोलीभाषेतील डिक्शनरी, एनसीआरटी पुणेच्या सर्व अभ्यासमाला उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शिक्षण विभाग, शाळा सिद्धी, शिष्यवृत्ती, स्कूल रिपोर्ट कार्ड, शालेय पोषण आहार, शासन निर्णय, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आदी महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली आहे.अध्ययन अनुभवात रंजकता निर्माण व्हावी, यासाठी शैक्षणिक साहित्याची माहिती, लेखन, वाचन, भारताचे नकाशे, बोलक्या भिंती साहित्य, वर्ग काढण्याची सोपी पद्धत दिली आहे. शाळाविषयक माहितीमध्ये शैक्षणिक साहित्य, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन, शाळा विकास आराखडा, सर्वच स्पर्धा परीक्षांची माहिती पीडीएफ स्वरूपात दिली आहे.
डायटच्या ब्लॉगवर गृहपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:00 AM
कोरोनामुळे देशभरातील शाळा शैक्षणिक सत्र संपण्याच्या पूर्वीच बंद करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शाळा नेमक्या कधी सुरू होतील, याची निश्चित तारीख नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने आॅनलाईन शिक्षणावर विशेष भर दिला आहे.
ठळक मुद्देइतरही माहिती उपलब्ध : विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन अभ्यासाची सोय