राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत आवास योजना, ग्रामीण अशा विविध घरकूल योजनेच्या माध्यमातून उत्कृष्ट घरकूल बांधकाम केल्याबद्दल लाभार्थ्यांचा तसेच सर्वाेत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी आमदारांनी उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तीचे तसेच ग्रामपंचायतीचे कौतुक करुन यापुढे असेच उत्तमोत्तम कार्य करून गावाचे नावलौकिक करण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती नीता ढोरे, संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन शाखा अभियंता के. आर. सलामे, ए. के. मेश्राम, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रियंका घोळवे, मयुरी मने, चेतककुमार सलाम व अखिल वैरकार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन गटशिक्षणाधिकारी एन. डी. कोकुर्डे यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी (पंचायत)आर.टी. पारधी यांनी मानले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच व लाभार्थी उपस्थित होते.
(बॉक्स)
या ग्रामपंचायतींचा झाला गौरव
उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून चुरमुरा (प्रथम क्रमांक), ग्रामपंचायत सुकाळा(द्वितीय क्रमांक), ग्रामपंचायत मोहझरी(तृतीय क्रमांक) तसेच राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ग्रामपंचायत सुकाळा (प्रथम क्रमांक), ग्रामपंचायत इंजेवारी(द्वितीय क्रमांक), व ग्रामपंचायत पळसगांव (तृतीय क्रमांक) या ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव तसेच पंचायत समितीचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता राकेश सुधाकर चलाख यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.