लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सीआरपीएफ १९२ बटालियनच्या वतीने पोलीस संकूल कॅम्पमध्ये बटालियनचा ८० वा स्थापना दिन शनिवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी नक्षलग्रस्त भागात दोन वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या जवानांचा आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मान करण्यात आला. दरम्यान शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.स्थापना दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह होते. सर्वप्रथम उपस्थित अधिकाऱ्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कमांडंट जियाऊ सिंह यांना गार्डद्वारा वाहिनी क्वॉर्टर गार्डवर सलामी देण्यात आली. मुख्यालयात सैनिक संमेलन घेण्यात आले.सैनिक संमेलनानंतर नक्षलग्रस्त क्षेत्रात दोन वर्षांहून अधिक काळ सेवा देणाºया जवानांचा कमांडंट जियाऊ सिंह यांच्या हस्ते आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मान करण्यात आला. तसेच परिसरात विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. सीआरपीएफ जवानांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाला सीआरपीएफचे बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी दीपककुमार साहू, प्रभात गौतम, उपकमांडंट कैलास गंगावणे, सपन सुमन, संध्या राणी, वेदपाल सिंह, चिकित्सा अधिकारी रवीकिरण दिघाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीआरपीएफ १९२ बटालियनच्या जवानांनी सहकार्य केले.सीआरपीएफचा गौरवशाली इतिहाससीआरपीएफ या दलाचे गठन ब्रिटिश सरकारद्वारे २७ जुलै १९३९ मध्ये क्राउन रिप्रजेन्टेटीव पोलीस यांच्या रूपात करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने २८ डिसेंबर १९४९ मध्ये केंद्रीय रिझर्व पोलीस बल कायदा पारित करण्यात आला. तसेच या दलाला केंद्रीय राखीव पोलीस दल असे नाव देण्यात आले. सध्यास्थितीत जगातील सर्वात मोठे अर्धसैनिक दल म्हणून सीआरपीएफची ओळख आहे. आजपर्यंत सीआरपीएफच्या जवानांनी संकट काळात आपला पराक्रम दाखविला व बलिदान दिले, अशी ऐतिहासिक माहिती संमेलनात कमांडंट जियाऊ सिंह यांनी बटालियनच्या स्थापना दिनानिमित्त दिली.
आंतरिक सुरक्षा पदकाने जवानांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:20 AM
सीआरपीएफ १९२ बटालियनच्या वतीने पोलीस संकूल कॅम्पमध्ये बटालियनचा ८० वा स्थापना दिन शनिवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी नक्षलग्रस्त भागात दोन वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या जवानांचा आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मान करण्यात आला.
ठळक मुद्देशहिदांना वाहिली श्रद्धांजली । सीआरपीएफ १९२ बटालियनचा ८० वा स्थापना दिन साजरा