लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना गोटूल बहूउद्देशीय समिती गडचिरोली तर्फे क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा १६० वा गौरव दिन तथा समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रविवारी करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. चंदा कोडवते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. चरणदास पेंदाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. नरेश मडावी, सदानंद ताराम, भारती इष्टाम, सुवर्णा वरखडे, भरत येरमे, नामदेव गडपल्लीवार, गोंडी साहित्यीक नंदू पेंदाम, ह. ना. कोटनाके, रामचंद्र काटेंगे, गुलाब मडावी, रमेश आत्राम, वसंत पोरेटी, सुरेश किरंगे, डॉ. सुरज मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. चंदा कोेडवते म्हणाल्या, आदिवासींच्या विकासासाठी शासनाकडून सध्या राबविण्यात येत असलेले धोरण व योजना यांच्यामध्ये अनेक दोष आहेत. आदिवासींच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरण आखने आवश्यक आहे.मागील अनेक वर्षांपासून आदिवासी समाज आरोग्य, शिक्षण, अन्न यासाठी संघर्ष करीत आहे. आरोग्य व्यवस्था पोहोचली नसल्याने कुपोषणाची समस्या गंभीर होत आहे. देशातील एकुण कुपोषित मुलांमध्ये दलीत व आदिवासी मुलांचे प्रमाण अधिक आहे. आदिवासींसाठी अनेक योजना असल्या तरी या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. आदिवासींची बहुतांश मुले आश्रमशाळांमध्ये शिकतात मात्र आश्रमशाळांची अवस्था अतिशय वाईट आहे. या आश्रमशाळांमधून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार होण्याऐवजी त्यांची अधोगती होत आहे. डीबीटीची योजना विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहे. असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप वरखडे, संचालन महेंद्र शेडमाके तर आभार पुरूषोत्तम मडावी यांनी मानले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य सादर केले. तसेच आयटीआय चौकातील गोंडीधर्म स्थळ ते इंदिरा गांधी चौकापर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 9:49 PM
गोंडवाना गोटूल बहूउद्देशीय समिती गडचिरोली तर्फे क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा १६० वा गौरव दिन तथा समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रविवारी करण्यात आले.
ठळक मुद्देगोंडवाना गोटूल बहुउद्देशीय समितीचा पुढाकार : गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन