काेराेनाचे संकट असतानाही आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्व्हे करणे, त्याचे रेकाॅर्ड तयार करणे, कोरोना लसीकरणअंतर्गत कॅम्पमध्ये हजर राहून कामे करणे, आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या. या व्यतिरिक्त त्यांना नेमून दिलेली ७२ पेक्षा जास्त कामे करावी लागतात. आरोग्य विभागात कर्तव्यावर राहून अनेक जोखमीची कामे करवून घेतली जातात. मात्र इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकर मार्गी लावाव्यात; अन्यथा राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा आमदार गजबे यांना निवेदनातून देण्यात आला. याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार, असे आश्वासन आमदार गजबे यांनी शिष्टमंडळाला दिले.
निवेदन देताना आम्रपाली सोरते, देवानंद बन्सोड, वनिता साखरे, रत्नमाला गेडाम, संध्या बोदेले, दीपिका गुरनुले, फरजाना शेख, रत्ना मेश्राम, सविता पारधी, देविका सोनवाणे, उज्ज्वला मेश्राम, वर्षा सूर्यवंशी, गीता मेश्राम, संजीवनी आठवले, विद्या सहारे, प्रीती मसराम, निर्मला घोडमोडे, कल्पना मेश्राम, उषा मेश्राम, मंगला ढोरे, रेखा दोनाडकर, सारिका चंदनकार, नीता तोंडरे, आदी आशा वर्कर व गटप्रवर्तक उपस्थित होते.