लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात धान पिकावर आलेल्या मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पीक हातचे जाऊन शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण शेतातील पीक कापणी झाल्यानंतर शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वरातीमागून घोडे चालविण्याच्या या प्रकाराने संबंधित यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या सर्व्हेक्षणाचा शेतकºयांना लाभ होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.यावर्षी खरीप हंगामात धानासोबत कापसावरही मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षेपेक्षा बरेच कमी उत्पन्न होत आहे. याबाबत स्थानिक आमदारांसह खासदारांनीही पीकांचे पंचनामे, सर्व्हेक्षण करण्याची विनंती शासनाकडे केली होती. पण प्रत्यक्षात वरिष्ठांकडून निर्देश आल्याशिवाय जिल्हास्तरावर प्रशासनाने हालचाल केली नाही. दि.५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पीक बाधित शेतकºयांना मदत देण्यासाठी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकाºयांना पाठविल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी ८ डिसेंबरला सर्व तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. या पंचनाम्यांमध्ये ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान असणाºया शेतकºयांना मदतीस पात्र ठरविले जाणार आहे. मात्र आता शेतात पिकच नाही तर पंचनामे काय करणार? असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.
पीक पंचनाम्यांबाबत शासनाचे वरातीमागून घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:49 AM
यावर्षी जिल्ह्यात धान पिकावर आलेल्या मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पीक हातचे जाऊन शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण शेतातील पीक कापणी झाल्यानंतर शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्देकापणीनंतर आला आदेश : महसूल विभागापुढे पेच