शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

७३९ हेक्टरवर होणार फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:34 AM

फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.

ठळक मुद्दे९९ हजार रोपे : कृषी विभागाचे प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रावर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील जमीन व वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी येथील शेतकरी अजूनपर्यंत फळबागेकडे वळला नसल्याचे दिसून येते. फळबागेमध्ये काही वर्ष आंतरपीक घेता येत असल्याने शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होण्यास मदत होते. येथील शेतकरी फळबागेकडे वळावा, यासाठी कृषी विभागाच्या मार्फत प्रयत्न सुरू आहेत. २०१७-१८ या वर्षात प्रती कृषी सहायक १० हेक्टरचे लक्षांक देण्यात आले होते. त्यानुसार २५३ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी केल्यानंतर २०१ शेतकऱ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यातील ४१ शेतकºयांनी ४२.४८ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे.यावर्षी ३५० हेक्टरवर आंबा, प्रत्येकी ५० हेक्टरवर काजू, चिकू, कागदी लिंबू, आवळा रोपे, प्रत्येकी १० हेक्टरवर सीताफळ, आवळा कलमे, जांभूळ, फणस व बांबू पिकाची लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व थोड्या प्रमाणात मदत उपलब्ध करून दिल्यास शेतकरी फळबागांकडे वळेल, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी आंबा, काजू, चिकू, सिताफळ, काजू, लिंबू, आवळा, जांभूळ, फणस आदी फळांची कलमे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना या कलमांचे कृषी विभागाच्या मार्फत वितरण होणार आहे.२०१८-१९ यावर्षात ७३९ हेक्टरवर ९९ हजार फळझाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यात सोनापूर, वाकडी, कृष्णनगर, रामगड व कसनसूर येथे शासकीय रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये कलमे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.आंबा पिकाकडे कलगडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन आंबा पिकासाठी योग्य असल्याने आंबा पिकाचे चांगले उत्पादन होत असल्याचा शेतकºयांचा अनुभव आहे. त्यामुळे आंबा पिकाखालील क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी ४२ हेक्टरवर आंबा पिकाची लागवड झाली.