शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

उकाड्याने रूग्णालयात रूग्ण बेचैन

By admin | Published: May 18, 2016 1:25 AM

जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रत्येक वार्डामध्ये चार कुलर लावण्यात आले आहेत. या कुलरमध्ये बाथरूममधील पाणी भरण्यासाठी पाईपही देण्यात आला आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालयातील स्थिती : कुलर आहेत, मात्र कर्मचारी पाणी भरत नाहीदिगांबर जवादे गडचिरोलीजिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रत्येक वार्डामध्ये चार कुलर लावण्यात आले आहेत. या कुलरमध्ये बाथरूममधील पाणी भरण्यासाठी पाईपही देण्यात आला आहे. मात्र आरोग्य कर्मचारी नियमितपणे कुलरमध्ये पाणी भरत नसल्याने रूग्णालयातील बहुतांश कुलर कोरडेठाक असल्याचे मंगळवारी दुपारी १२ वाजता लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीदरम्यान दिसून आले. त्यामुळे रूग्णांचे गर्मीने सध्या बेहाल सुरू आहे. अहेरी येथे रूग्णालयात जनरेटर बंद असल्यामुळे नवजात बालकांना घेऊन मातांना बाहेर रात्र काढावी लागली. या घटनेनंतर जिल्हा रूग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यात अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले.जिल्हा सामान्य रूग्णालयात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील रूग्ण तसेच चंद्रपूर जिल्हा व छत्तीसगड राज्यातीलही रूग्ण दाखल होतात. सध्या ग्रामीण भागामध्ये तापाची साथ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे शेकडो रूग्ण रूग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. बेड कमी पडत असल्याने काही रूग्णांना फरशीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहे. प्रत्येक वार्डामध्ये जवळपास ३२ बेड आहेत व जमिनीवर गादी टाकून जवळपास १६ रूग्ण उपचार घेतात. म्हणजेच प्रत्येक वार्डामध्ये जवळपास ५० रूग्ण दर दिवशी उपचार घेतात. उन्हाळ्यातील गर्मीमुळे रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक वार्डामध्ये चार कुलर लावण्यात आले आहेत. कुलरमध्ये त्याच वार्डातील बाथरूममधील नळाला पाईप लावून पाणी भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक वार्डासाठी स्वतंत्र पाईप देण्यात आला आहे. व या कुलरमध्ये नियमितपणे पाणी भरण्याची जबाबदारी संबंधित वार्डातील आरोग्य कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र आरोग्य कर्मचारी कुलरमधील पाण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे कित्येक तास कुलर कोरड्या ठाक पडून राहतात व केवळ कुलरचा पंखाच फिरत राहतो. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक कुलरवर ‘कुलरला हात लावू नये’ अशी सूचना लिहिले कागद चिकटविण्यात आले आहे. त्यामुळे रूग्ण व त्यांचे नातेवाईक कुलरला हात लावत नाही व पाणी संपले आहे, हे आरोग्य कर्मचाऱ्याला सांगण्याची हिंमतही करीत नाही. त्यामुळे कोरडाच कुलर सुरू राहतो. सर्वात वरचा मजला मोठ्या प्रमाणात तापत असल्याने येथील रूग्णांची सर्वात मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येते. विशेष करून नवजात बालके व त्यांच्या मातांचे गर्मीमुळे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षांपासून खस बदलविले नाहीपाण्याचा निचरा होण्यावर कुलरची थंड हवा अवलंबून आहे. त्यामुळे किमान दोन वर्षानंतर कुलरची खस बदलविणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र रूग्णालयातील बहुतांश कुरलरची खस मागील पाच वर्षांपासून बदलविली नसल्याचे दिसून आले. काही कुलरची अर्धी अधिक खस जाळीतून निघून गेली आहे. त्या ठिकाणी छिद्र पडले आहेत. तर काही कुलरच्या खसवर धुळीचा थर बसला आहे. त्यामुळे पाणी अलगदपणे वरून सरळ पाण्याच्या टाकीमध्ये पडते. या सर्वांचा परिणाम म्हणजे कुलरची हवा पाहिजे त्या प्रमाणात थंड येत नाही. काही कुलरची स्पिडही कमी आहे. तेवढ्या मोठ्या वार्डामध्ये केवळ चार कुलर लावण्यात आल्या आहेत. त्या पुरेशा नसल्याचे दिसून येते.