लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचे पदे गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहे. तसेच येथील इतर महत्त्वाची १२ पदे रिक्त असून प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांच्या भरवशावर या रुग्णालयाची सेवा आहे. नियमित वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रुग्णालयाची सेवा ढेपाळली आहे.आरमोरीचे उपजिल्हा रुग्णालय हे ५० खाटांचे रुग्णांलय असून येथे एकूण ४८ पदे मंजूर आहेत. यापैकी ३५ पदे भरण्यात आली असून १३ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक १, वरिष्ठ लिपीक १, सहायक अधिसेविका १, परिसेविका २, अधिपरिचारिका २, बाह्य रुग्ण विभाग लिपीक १, कक्ष सेवक ३, व्रणोपचारक आणि शस्त्रक्रिया गृहपरिचर आदींचा समावेश आहे.रिक्त पदामुळे रुग्णालयाच्या सेवेवर व कामकाजावर त्याचा परिणाम पडत आहे. या रुग्णालयात औषधोपचारासाठी दररोज शेकडो रुग्ण येतात. मात्र येथे पदे रिक्त असल्याने पुरेशी आरोग्य सेवा वेळेवर मिळत नाही. येथील वैद्यकीय अधीक्षकांचे पद जुलै २०१८ पासून रिक्त आहे. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद गवई यांचे स्थानांतरण झाल्यानंतर या रुग्णालयात स्थायी वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. तेव्हापासून येथील वैद्यकीय अधीक्षकांचा प्रभार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.छाया उईके यांच्याकडे देण्यात आला. मात्र गेल्या दोन महिन्यापासून त्या रजेवर असल्याने त्यांनी आपला प्रभार डॉ.परमानंद बन्सोड यांच्याकडे दिला. मात्र आर्थिक व्यवहाराचे अधिकार डॉ.उईके यांच्याकडेच आहे. त्यामुळे लहानसहान कामासाठी त्यांच्या स्वाक्षरीची गरज पडत असल्याने येथील लिपीकाला वारंवार स्वाक्षरी घेण्यासाठी गडचिरोलीला चकरा माराव्या लागतात. सध्या मार्च महिना सुरू असल्याने लिपीकाची सुद्धा अडचण वाढली आहे.येथे रुग्णालयाचा कारभार सांभाळणारे नियमित वैद्यकीय अधीक्षक नसल्याने येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. परिणामी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातही अनेक सुविधांचा अभावजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा, देलनवाडी, भाकरोंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. याशिवाय सदर आरोग्य प्राथमिक केंद्राअंतर्गत ठाणेगाव व इतर ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व पथक आहेत. मात्र आरोग्य केंद्र, उपकेंद्र व पथकामध्ये विविध सोसीयुविधांचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुरेसा औषधसाठा नाही. चांगल्या प्रकारच्या खाटा नाहीत. तसेच इतर आवश्यक साहित्याचाही अभाव आहे. मात्र याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.
प्रभारींवरच रुग्णालयाची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 6:00 AM
आरमोरीचे उपजिल्हा रुग्णालय हे ५० खाटांचे रुग्णांलय असून येथे एकूण ४८ पदे मंजूर आहेत. यापैकी ३५ पदे भरण्यात आली असून १३ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक १, वरिष्ठ लिपीक १, सहायक अधिसेविका १, परिसेविका २, अधिपरिचारिका २, बाह्य रुग्ण विभाग लिपीक १, कक्ष सेवक ३, व्रणोपचारक आणि शस्त्रक्रिया गृहपरिचर आदींचा समावेश आहे.
ठळक मुद्देआरमोरीचे रुग्णालय : वैद्यकीय अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांची १३ पदे रिक्त