लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन अजूनपर्यंत झाले नाही. याबाबत कर्मचाºयांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली. अन्यथा १ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग ४ पासून ते वैद्यकीय अधिकाºयांपर्यंत शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाºयांच्या वेतनाची बिले तयार करणाºया लिपिकाची बदली झाली. तेव्हापासून कंत्राटी कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. या कर्मचाºयांना फारसा अनुभव नाही. त्यामुळे बिलात काही त्रुटी राहतात. त्रुटी असलेले बिल परत केले जाते. त्रुटी पूर्ण करून बिल सादर करण्यास पुन्हा विलंब होते. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार बिल बनविले जात आहे. यातही अनेक त्रुट्या निघत आहेत. परिणामी वेतनास विलंब होत आहे. महिना उलटूनही वेतन न मिळाल्याने त्रस्त झालेल्या कर्मचाºयांनी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगण महातो, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ३१ तारखेच्या आत वेतन अदा करण्याचे आश्वासन डॉ. किलनाके यांनी दिले. ३१ तारखेपूर्वी वेतन न झाल्यास १ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी विस्तारी फेबुरवार, विनोद चंडाले, अरूण कोळी, अशोक रामटेके, वासुदेव महानंदे, किशोर महातो, रुपा चव्हाण, ममता चव्हाण, सुरेखा महातो हजर होत्या.
रुग्णालय कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:21 PM
जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन अजूनपर्यंत झाले नाही. याबाबत कर्मचाºयांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली. अन्यथा १ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ठळक मुद्देनिवेदन : १ आॅगस्टपासून आंदोलनाचा इशारा