गडचिराेली : शहरातील इंदिरा गांधी चाैकात असलेल्या महिला व बाल रुग्णालयाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले हाेते. नालीचे पाईप चाेकअप झाल्याने ही समस्या निर्माण झाली हाेती. यासंदर्भात लाेकमतने साेमवारी वृत्त प्रकाशित करून न.प. प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान नगरसेविका अलका पाेहणकर व कर्मचाऱ्यांनी समस्येच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाेहाेचून त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पाईप टाकून सांडपाण्याचा मार्ग माेकळा केला.
मुख्य महामार्गाची नाली असलेल्या बाजूला भूमिगत पाईप टाकून येथे नाली तयार करण्यात आली आहे. ही नाली गडचिराेलीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या निवासस्थानासमाेरून जाते. राष्ट्रीय महामार्ग-कॅम्प एरियात जाण्यासाठी तहसीलदारांच्या निवासस्थानाजवळून रस्ता जाताे. या ठिकाणी नालीचे पाईप चाेकअप झाल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत हाेते. लाेकमतने हे वृत्त छायाचित्रासह प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन न.प.प्रशासनाने शनिवारी येथे जेसीबीच्या सहाय्याने खाेदकाम करून नवीन पाईप टाकले. आता येथे आवागमनाची व सांडपाण्याची समस्या सुटली आहे.