लोकमत न्यूज नेटवर्कपेरमिली : अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील किराणा दुकानदार शंकर येनप्रेड्डीवार यांच्या घराला आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. सदर घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.शंकर येनप्रेड्डीवार यांचे किराणा व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. या दुकानात ते अवैधरित्या पेट्रोल विक्रीचाही धंदा करीत होते. काही पेट्रोल दुकानात तर काही पेट्रोल घरी ठेवत होते. किराणा दुकानाच्या बाजूलाच स्वयंपाक खोली आहे. अनावधानाने आग लागली. जवळच्या पेट्रोलने भडका घेतल्याने बघताबघता आगीने पूर्ण व्यापले. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. परिणामी संपूर्ण घर जळून खाक झाले. पेरमिली येथे मोटार सायकल दुरूस्ती दुकानदार, किराणा व्यापारी व काही नागरिक किरकोळ पेट्रोल विक्रीचा अवैध व्यवसाय करतात. या व्यवसायाला आळा बसणे अत्यंत गरजेचे आहे.
पेरमिलीत घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:23 AM
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील किराणा दुकानदार शंकर येनप्रेड्डीवार यांच्या घराला आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. सदर घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देपेट्रोलमुळे आगडोंब : घरातून होणाऱ्या अवैध विक्रीचा परिणाम