शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
4
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
5
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
6
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
7
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
8
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
9
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
10
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
11
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
12
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
13
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
14
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
15
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
16
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
17
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
18
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
19
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
20
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड

ग्रामसभेसाठी सभागृह पडले अपुरे

By admin | Published: June 12, 2016 1:19 AM

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्या कुटुंबाना शासकीय घरकूल योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करण्याकरिता ८ जून रोजी वैरागड येथे विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली.

गोंधळ उडाला : घरकूल योजनेसाठी लाभार्थी निवड करायचे होतेवैरागड : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्या कुटुंबाना शासकीय घरकूल योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करण्याकरिता ८ जून रोजी वैरागड येथे विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली. या ग्रामसभेला गावकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने सभागृह अपुरे पडले. पात्र लाभार्थ्यांची निवड करताना गोंधळ झाल्याने विषयावर चर्चा न होताच गोंधळात ग्रामसभा आटोपती घ्यावी लागली.शासकीय घरकूल योजनेतून अनुसूचित जाती आणि जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना जवळपास १०० टक्के घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र शासनाच्या ग्राम उदय से भारत उदय या कार्यक्रमांतर्गत घरकूल लाभार्थ्यांना, शासकीय सेवेत नोकरी असणाऱ्यांना वार्षिक आर्थिक उत्पन्न जास्त असणाऱ्या कुटुंबांना वगळून कोणत्याही प्रवर्गातील कुटुंबाला टप्प्याटप्प्यात शासकीय घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी वैरागड येथे विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आलेल्या अर्जाचा ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा वाचन करून दाखविले. आणि ज्या अर्जावर आक्षेप घ्यायचे असेल त्यावर उपस्थितांनी आक्षेप घ्यावा, असे सुचविल्यानंतर गोंधळास सुरूवात झाली. घरकूल लाभार्थ्याचे अर्ज प्राप्त झाले. त्या अर्जाचे वाचन करून निकष योग्य असतील तर त्या अर्जाचा प्रथम विचार करून उर्वरित अर्ज प्रतीक्षा यादीत ठेवावे, अशी सूचना केली. पण ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून विषय योग्यरितीने मांडल्या न गेल्याने सभेत गोंधळ उडाला. (वार्ताहर)