शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

घरकुलाच्या आशेने झोपडीत वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:24 AM

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहरात सुमारे १ हजार २०० घरकूल मंजूर करण्यात आले आहे. घरकूल मिळेल, या आशेने नागरिकांनी घर बांधले नाही. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही घरकुलासाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे घर बांधण्याचे स्वप्न आणखी दूर जात आहे.

ठळक मुद्देवर्षभराचा कालावधी उलटला : गडचिरोलीवासीयांना अनुदानाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहरात सुमारे १ हजार २०० घरकूल मंजूर करण्यात आले आहे. घरकूल मिळेल, या आशेने नागरिकांनी घर बांधले नाही. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही घरकुलासाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे घर बांधण्याचे स्वप्न आणखी दूर जात आहे.शहरातील नागरिकांना पहिल्यांदाच घरकूल योजनेचा लाभ दिला जात आहे. गडचिरोली शहरातील विवेकानंदनगर, गोकुलनगर व फुले वार्डातील सुमारे १ हजार २०० घरांना मंजुरी प्रदान करण्यात आली. घरकुलांना मंजुरी मिळाल्यानंतर काही महिन्यातच निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा बाळगली जात होती. घरकूल मंजूर झाल्यानंतर काही दिवसातच अनुदान मिळले, या अपेक्षेवर शहरातील नागरिक होते. मात्र आता घरकूल मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटल चालला आहे.घरकूल मिळण्याच्या आशेवर नागरिक झोपडीतच वास्तव्य करीत आहेत. काही नागरिकांच्या झोपड्या कोसळण्याचीही शक्यता आहे. लाभार्थी नगर परिषदेत येऊन घरकूलाच्या निधीबाबत विचारणा करीत आहेत. मात्र कर्मचारीही निरूत्तर होत आहेत.अपुरा निधी मिळाल्यास पंचाईत२०२२ पर्यंत सर्वांना घर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्र शासनामार्फत देण्यात आले असले तरी या योजनेसाठी निधीची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे १८ हजार नागरिक घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. या लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली आहे. मात्र दरवर्षी शासन केवळ एक हजार ते दोन हजार घरकुलांना मंजुरी प्रदान करते. गडचिरोली शहरातील १ हजार २०० घरांना मंजुरी प्रदान करण्यात आली असली तरी तेवढा निधी एकाचवेळी उपलब्ध होईल, याची शक्यता कमीच आहे. अपुरा निधी उपलब्ध झाल्यास यादीमध्ये सर्वप्रथम ज्या व्यक्तीचे नाव आहे, त्याला घरकूल उपलब्ध होईल. शेवटच्या लाभार्थ्यांना मात्र आणखी काही वर्ष प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.