पैशाअभावी घरकूल कामावर येणाऱ्या मजुराची मजुरी कशी द्यायची, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. शेतातील कामे सुरू आहेत तर अजूनही रोवणी पूर्ण व्हायची आहे आणि अर्धवट घरकूल कामामुळे लाभार्थ्यांना राहण्याचा प्रश्न पडला आहे. तर अनेक घरकूल स्लॅब स्तरापर्यंत झाले परंतु एकही मस्टरची रक्कम मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक जणांचा निवासाचा प्रश्न असल्याने कधीपर्यंत भाड्याची रूम करून राहायचे आणि कधीपर्यंत घरकूल पूर्ण होणार याची लाभार्थ्यांना लगबग लागली आहे. पण मजुरांना मिळणारी रक्कम मिळत नसल्याने कामावर येणाऱ्या मजुरांना रक्कम तरी काेठून देणार? असा प्रश्न लाभार्थ्यांना समोर पडला आहे.
सर्वच बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने अनेक जणांची घर अपूर्ण आहेत. तर काही घरकूल पूर्ण झाले आणि काही शिल्लक आहे. त्यामुळे रोहयो अंतर्गत मिळणारी रक्कम मस्टर काढून देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.