गडचिराेली : स्वत:चे हक्काचे घर असावे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यानुसार आयुष्यभर व्यक्ती धडपडत असताे. कुणी लवकर, तर कुणी उशिरा घरांचे बांधकाम करताे. परंतु, काेराेनाकाळापासूनच बांधकाम साहित्याच्या किमती वधारल्याने घराचे स्वप्नही आता महागले आहे. लाेखंड, सिमेंट व अन्य बांधकाम साहित्य वाढल्याने महागाईत घर बांधकाम कसे करणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
गेल्या पाच वर्षांत दीडपट वाढले भाव
दाेन हजार विटांचा भाव
२०१८ - ५५००
२०१९ - ६०००
२०२० - ६५००
२०२१ - ७५००
२०२२ - ८५००
सहाऐवजी आता १२ टक्के जीएसटी
केंद्र शासनाने १ एप्रिलपासून ६ ऐवजी १२ टक्के जीएसटी मातीच्या विटांवर लागू केले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात वीटभट्टीची नाेंदणी करण्याकरिता जाणाऱ्या व्यावसायिकांना आता १२ टक्के जीएसटीची रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिक विटांचेही दर वाढवू शकताे.
चार रुपयांना एक वीट
गडचिराेली जिल्ह्यात ट्रॅक्टरद्वारे विटांची वाहतूक केली जाते. एका ट्रिपमध्ये जवळपास १ हजार ८०० विटा असतात. त्यामुळे थेट ट्रिपनुसार पैसे घेतले जातात. जवळपास एक वीट ४ रुपयांत ग्राहकाला पडते.
घराचे स्वप्न आणखी महागणार
बांधकाम साहित्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही मजुरीसुद्धा वाढत आहे. त्यामुळे घर बांधकामाचे स्वप्न महाग हाेत चालले आहे. आणखी दर वाढल्यास घर बांधणेच कठीण हाेईल.
वीटनिर्मितीची मजुरी वाढली. काेंढ्याचे दर वाढले. तसेच वीट वाहतुकीसाठी हमाली व डिझेलचाही दर वाढल्याने
वीटनिर्मितीच महागली. त्यामुळे आता विटा किती रुपयात विक्री कराव्या, हा प्रश्न आहे. पूर्वीसारखा नफा ह्या व्यवसायात राहिला नाही.
रमेश बाेबाटे, व्याावसायिक