शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

पत्रच नाही तर मानव विकास मिशनची बस कशी जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 5:00 AM

मानव विकास मिशनमार्फत आठवी ते बारावी व अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी माेफत पासेस उपलब्ध करून दिले जातात. ज्या ठिकाणचे पासेस आहेत. त्या मार्गावर महामंडळामार्फत बसेस चालविल्या जातात. पहिल्या दिवशीपासूनच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील यासाठी मुख्याध्यापकांनी अगाेदरच कार्यवाही करणे आवश्यक आहे; मात्र सात दिवसांचा कालावधी उलटला तरी बसेस संदर्भात अजूनही पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर बसेस नाहीत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शाळा सुरू हाेऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत मुख्याध्यापकांनी मानव विकास मिशनची बस व पासेससाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे आगारामार्फत अंदाजानुसार बसेस साेडल्या जात आहेत. काही मार्गांवर विद्यार्थी आहेत मात्र बस नाहीत तर काही मार्गांवर बस जात आहेत मात्र विद्यार्थी नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गडचिराेली आगाराला मानव विकास मिशनतर्फे ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व बसेस विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी वापरायच्या आहेत. मानव विकास मिशनमार्फत आठवी ते बारावी व अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी माेफत पासेस उपलब्ध करून दिले जातात. ज्या ठिकाणचे पासेस आहेत. त्या मार्गावर महामंडळामार्फत बसेस चालविल्या जातात. पहिल्या दिवशीपासूनच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील यासाठी मुख्याध्यापकांनी अगाेदरच कार्यवाही करणे आवश्यक आहे; मात्र सात दिवसांचा कालावधी उलटला तरी बसेस संदर्भात अजूनही पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर बसेस नाहीत. ज्या मार्गावर कमी प्रवासी मिळतात अशा मार्गावरील बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. 

डिझेलचा तुटवडा त्यात धावतात रिकाम्या बसेस आगारात डिझेलचा नेहमीच तुटवडा राहताे. महत्त्वाच्या मार्गावरील बसेस रद्द केल्या जातात; मात्र विद्यार्थिनींची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी बसेस साेडल्या जातात. काही मार्गांवर विद्यार्थिनीच नसल्याने बसेस रिकाम्या धावत आहेत. यात महामंडळाला ताेटा सहन करावा लागत आहे. 

मुख्याध्यापकांनी पत्र द्यावे-    ज्या मार्गावर बसेसची गरज आहे. त्या मार्गावरील विद्यार्थिनींच्या पासेस काढण्यासाठी मुख्याध्यापकांनी पत्र देणे आवश्यक आहे; मात्र अजूनपर्यंत एकाही मुख्याध्यापकाने पासेसबाबत पत्र दिले नाही. दहा महिने कालावधीचे पास एकाचवेळी दिले जाणार आहेत.  

स्मार्ट कार्ड काढणे सुरूज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड असणे आवश्यक करण्यात आले आहे. गडचिराेली आगारात स्मार्ट कार्ड काढणे सुरू आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष आहे.

निम्म्या बसेसवर कारभारगडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. त्यापैकी २० बसेस पंढरपूरच्या जत्रेसाठी गेल्या आहेत. १५ बसेस नादुरुस्त अवस्थेत सुट्ट्या भागांसाठी आगारातच उभ्या आहेत. तर ६ बसेस चंद्रपुरातील वर्कशाॅपमध्ये उभ्या आहेत.  एकूण ४१ बसेस कमी आहेत. केवळ ६२ बसेसवर आगाराचा कारभार सुरू आहे. 

 

टॅग्स :Schoolशाळाstate transportएसटी