गडचिरोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २५ फेब्रुवारीला बारावीचा निकाल ऑनलाइन पध्दतीने जाहीर केला. नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याने ९२.७२ टक्के गुण घेऊन दमदार कामगिरी करत द्वितीयस्थान पटकावले. जिल्ह्यात पोरांच्या तुलनेत पोरीच हुश्शार असल्याचे स्पष्ट झाले. मुलींचा गुणवत्तेचा टक्का ९४.७० तर मुलांचा ९०.८३ टक्के इतका आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यातून १२ हजार १०२ मुलांनी नोंदणी केली होती. यात ६ हजार २०२ मुले तर ५९०० मुलींचा समावेश आहे. प्रत्यक्षात ११ हजार ९०८ विद्यार्थ्यांनी (मुले ६०७७, मुली ५८३१) परीक्षा दिली. यापैकी ११ हजार ४२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. यात ५ हजार ५२० मुले व ५ हजार ५२२ मुलींचा समावेश आहे. दरम्यान, नागपूर विभागात गडचिरोलीने द्विीतय स्थान पटकावले असून कला शाखेत जिल्हा अव्वलस्थानी तर विज्ञानमध्ये तृतीयस्थानी आहे.
गुणवत्तेत घट
बारावी परीक्षेत गतवर्षीच्या तुलनेत गुणवत्तेत घट झाली आहे. २०२२ मध्ये गडचिरोलीचा एकूण निकाल ९६ टक्के लागला होता. गतवर्षीही मुलांच्या तुलनेत मुलींचाच गुणवत्तेचा टक्का अधिक होता. मुलांची सरासरी गुणवत्ता ९५.३६ , तर मुलींची ९७.६७ टक्के होती. यंदा जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.७२ टक्क्यांपर्यंत घसरला.
शाखानिहाय निकाल असा....शाखा - टक्केवारीविज्ञान - ९८.३६कला - ८९.२१वाणिज्य - ८७.९२व्यवसाय अभ्यासक्रम - ८८.४७