लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोरी, येल्ला व लगाम नियत क्षेत्रातील शंभरहून अधिक सागवानी वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तोडलेल्या लाकडांची तेलंगणा राज्यात तस्करी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच वनविभागाने संबंधित बीटमधील वनरक्षकाला निलंबित केले तर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यासह क्षेत्र सहायकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.आलापल्ली येथील सागवानाचा दर्जा अतिशय चांगला आहे. या सागवानी लाकडापासून बनविलेल्या वस्तूंना चांगली किम्मत मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी बोरी, लगाम, येल्ला व तुमरगुंडा या नियत क्षेत्राचे अवलोकन केले असता तेथे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड झाल्याचे आढळून आले. बोरीच्या वनपालाने सलग चार दिवस पंचानामे करून उपविभागीय वनाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला. बिटाचे अवलोकन करण्याचे आदेश फिरत्या वन पथकाला दिले. फिरत्या वन पथकाने पाहणी करून अहवाल वरिष्ठांना सादर केला. सादर केलेला अहवाल बघून वनविभागाचे अधिकारी चक्रावून गेले. सर्वाधिक अवैध वृक्षतोड असलेल्या बोरीच्या वनरक्षकास निलंबित केले आणि तेथील क्षेत्र सहायक व वनपरिक्षेत्राधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.बोरीला लागून असलेल्या प्राणहिता नदी पात्रातून तेलंगणा राज्यात लाकडांची तस्करी करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना वनरक्षकाच्या कसे काय नजरेस पडले नाही. असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा अर्थ वनरक्षक हे नियमित आपल्या कर्तव्यावर राहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. वनकर्मचारी आपले कर्तव्य बजावतात काय याकडे वरिष्ठांनीही लक्ष देणे गरजेचे आहे.सदर गंभीर प्रकार वनविभागाच्या लक्षात येताच संबंधित वनकर्मचाºयाला निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचारी व वनपरिक्षेत्राधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.- चंद्रकांत तांबे, उपवनसंरक्षक, आलापल्ली
लगाम क्षेत्रात शेकडो सागवानी झाडांची कटाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:26 AM
अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोरी, येल्ला व लगाम नियत क्षेत्रातील शंभरहून अधिक सागवानी वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तोडलेल्या लाकडांची तेलंगणा राज्यात तस्करी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली.
ठळक मुद्देवनरक्षक निलंबित : वनपरिक्षेत्राधिकाऱ्यासह क्षेत्र सहायकाला नोटीस