शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

ताडी पेय विक्रीतून शेकडाे नागरिकांना मिळताहे राेजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:57 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क सिराेंचा : माणसाच्या आराेग्यासाठी अतिशय लाभदायक असणाऱ्या ताडी पेय विक्रीच्या हंगामास सिराेंचा तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सिराेंचा : माणसाच्या आराेग्यासाठी अतिशय लाभदायक असणाऱ्या ताडी पेय विक्रीच्या हंगामास सिराेंचा तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात सुरुवात झाली आहे. ताडी पेय हंगामाच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडाे नागरिकांना राेजगार मिळत आहे. उन्हाळ्यामध्ये ताडीची मागणी वाढत असल्याने नागरिकांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असते.

ताडी व गाेरगा हे दाेन वृक्ष अतिशय दुर्मिळ समजले जात असले तरी सिराेंचा तालुक्याच्या झिंगानूर, रेगुंठा, काेटापल्ली, परसेवाडा, पातागुडम, अंकिसा, नगरम आदी भागातील गावांमध्ये या दाेन्ही वृक्षांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. सध्या थंडीला सुरुवात झाली असून यासाेबतच तालुक्याच्या ग्रामीण भागात ताडी पेय उपलब्ध हाेत आहे. जानेवारीपासून तर मे महिन्यापर्यंत साधारणत: पाच महिने ताडी पेयाचा हंगाम राहणार आहे. सिराेंचा तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात ताडी व सिंदी हे पेय उपलब्ध हाेते. मात्र सिराेंचा तालुक्यात ताडीच्या झाडांची संख्या प्रचंड असल्याने ताडीचे प्रमाणही माेठे आहे. ताडी झाडावरून काढल्यानंतर संबंधित झाड पूर्णत: वाळून जाते. त्यानंतर ताडीची झाडे ताेडून टाकली जातात. याचा उपयाेग शेती व घरासभाेवताल कुंपण करण्यासाठी केला जाताे.

गाेरगा व ताडीच्या झाडाच्या पानांचा उपयाेग झाेपडी बांधण्यासाठी आजही केला जाताे. स्थानिक आदिवासी बांधव गाेरगा झाडास कल्पवृक्षासारखे महत्त्व देतात.

बाॅक्स

तेलुगू भाषक नागरिकांकडून पसंती

तेलुगू भाषक सणासुदीमध्ये ताडी प्राशनास अतिशय महत्त्व देतात. पूर्वीच्या काळात घरात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्यास गाेरगा वृक्षातील गाभ्यापासून पीठ बनवून त्यापासून पाेटाची भूक भागविली जात हाेती. गाेरगा झाडाच्या आतील गाभा काढून त्याचे पीठ तयार केले जात हाेते. या पिठापासून बनविलेल्या आंबील पदार्थाचाही दैनंदिन आहारामध्ये वापर केला जात असे. विशेष म्हणजे, तेलुगू भाषक नागरिकांकडून ताडीला माेठी पसंती मिळते.

===Photopath===

040121\04gad_2_04012021_30.jpg

===Caption===

सिराेंचा तालुक्यात असलेली ताडीची झाडे.