शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

जिल्ह्यातील शेकडो शाळांपर्यंत वीज पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:33 PM

जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमांसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना लगतच्या घरातून भाड्याने वीज घ्यावी लागत आहे. विजेअभावी अनेक अडचणी जाणवत आहेत.

ठळक मुद्देसाधने धूळखात : अध्यापनावर होत आहे विपरित परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमांसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना लगतच्या घरातून भाड्याने वीज घ्यावी लागत आहे. विजेअभावी अनेक अडचणी जाणवत आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५३ व नगर परिषदेच्या १८ अशा एकूण १ हजार ५७१ प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये जि. प. च्या १ हजार ५३८ प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक १० तसेच ५ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहेत. गडचिरोली, देसाईगंज नगर पालिकेच्या एकूण १८ शाळांपैकी ५ शाळांमध्ये उच्च प्राथमिक वर्गाच्या शिक्षणाची सुविधा आहे. जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या एकूण १५७१ पैकी १ हजार २१५ शाळांमध्ये विद्युतीकरणाची सुविधा आहे. तर ३५० शाळा अद्यापही विद्युतीकरणापासून दूर आहेत.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळा उघडल्यानंतर सकाळची प्रार्थना, पसायदान व दैनंदिन परिपाठ घेण्यासाठी लाऊडस्पिकरचा वापर करण्यात यावा, अशा सूचना आहेत. ज्या शाळांमध्ये विद्युतीकरणाची सुविधा आहे, अशा शाळांनी लाऊडस्पिकर व साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली आहे. मात्र वीज नसलेल्या तब्बल ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विना लाऊडस्पिकरच्या सहाय्याने सकाळचा परिपाठ घेतल्या जात आहे. वीज नसलेल्या शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी व सराव करण्यासाठी शिक्षकांच्या भ्रमणध्वनी संचाचा वापर केला जात आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेने शाळा विद्युतीकरणासाठी विशेष आर्थिक तरतूद करून जिल्ह्यातील सर्व शाळा विद्युतीकरणातून सोयीसुविधायुक्त कराव्यात, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे. शाळांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून साधने खरेदी केले आहेत. मात्र ही साधने आता बेकामी ठरले आहेत. शिक्षण विभागाने वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आहे.वर्ग खोल्याही नाहीजिल्ह्यात जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या एकूण १ हजार ५७१ शाळा आहेत. या सर्वच शाळांना इमारती आहेत. मात्र या सर्व शाळा मिळून वर्ग खोल्यांची संख्या १ हजार ३४९ आहे. तब्बल २२२ वर्ग खोल्या शाळांच्या संख्येच्या तुलनेत कमी पडत आहे. या शाळांना तत्काळ स्वतंत्र वर्ग खोल्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Schoolशाळाelectricityवीज