शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पुन्हा मिळणार माेफत सिलिंडर पण महागडा गॅस कसा भरणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 5:00 AM

यापूर्वी उज्ज्वला याेजनेला सुरुवात झाली. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडेल, या उद्देशाने अनेकांनी गॅस जाेडण्या घेतल्या. त्यानंतर गॅसच्या किमती दुप्पट वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी गॅस भरणे बंद केले आहे. रिकामे सिलिंडर घरी पडून आहे, तर पुन्हा चुलीवरच स्वयंपाक सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. 

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, खरी अडचण गॅस भरण्याची आहे. गॅसच्या किमती वाढल्याने अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस भरणे परवडेल काय? असा प्रश्न उपस्थित आहे. यापूर्वी उज्ज्वला याेजनेला सुरुवात झाली. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडेल, या उद्देशाने अनेकांनी गॅस जाेडण्या घेतल्या. त्यानंतर गॅसच्या किमती दुप्पट वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी गॅस भरणे बंद केले आहे. रिकामे सिलिंडर घरी पडून आहे, तर पुन्हा चुलीवरच स्वयंपाक सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. 

सिलिंडर भरणे कसे परवडणार 

ज्यावेळी गॅस खरेदी केला. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. आता मात्र त्या प्रचंड वाढल्या आहेत. केवळ स्वयंपाक करण्यासाठी महिन्याचे एक हजार रुपये खर्च करणे शक्य नाही. परिणामी आता चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. -उषा बन्साेड, गृहिणी

उज्ज्वला याेजनेतून खरेदी केलेला सिलिंडर घरातच पडून आहे. पूर्वीही आम्ही चुलीवरच स्वयंपाक करीत हाेताे. आताही चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. जुनेच दिवस आलेत. चुलीवरचा स्वयंपाक गॅसच्या तुलनेत रुचकर लागतो. तसेच गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेण्यासारख्या घटनांपासून दूर राहता येते.- काशीबाई पेंदाम, गृहिणी

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर