आॅनलाईन लोकमतधानोरा : आयएएस १८ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील मेंढा गावाला भेट देऊन ग्रामसभेचे कामकाज कसे चालते, याबाबतची माहिती गावकऱ्यांकडून जाणून घेतली.प्रशिक्षणार्थी अधिकारी गडचिरोेली जिल्ह्याच्या दौैऱ्यावर आहेत. त्यांनी २५ जानेवारी रोजी कुरखेडा येथील अगरबत्ती प्रकल्पाला भेट दिली. त्याचबरोबर वन विभागाची माहिती जाणून घेतली. शुक्रवारी मेंढा येथे भेट दिली. मेंढा हे गाव वनहक्काची अंमलबजावणी करण्यात देशात अग्रेसर आहे. यावेळी चर्चा करताना ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामसभा ही कशा पद्धतीने चालविली जाते, यामध्ये कशापद्धतीने निर्णय घेतले जातात, याची माहिती दिली. ग्रामसभा तेंदू व बांबूची मागील दोन वर्षांपासून स्थानिक मजुरांद्वारे कटाई करीत आहे. एकूण प्राप्त उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम विकास निधीसाठी राखीव ठेवल्या जाते व या निधीतून जंगलाचे व्यवस्थापन केल्या जाते. मागील दोन वर्षात ग्रामसभेने सुमारे ४० लाख रूपये फिक्स डिपोझिट केली आहे, अशी माहिती दिली.यावेळी समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर, ठाणेदार विजय पुराणिक उपस्थित होते. आयएएस अधिकाºयांच्या चमूंनी उपविभागीय अधिकारी कार्यालय कारवाफा तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाला भेट देऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. मेंढा-लेखा गावाच्या प्रगतीचे उपस्थित अधिकाऱ्यांनी कौतुक केले.सोडे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत चर्चाप्रशिक्षणार्थी आएएस अधिकाऱ्यांच्या चमूने धानोरा तालुक्यातील सोडे आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ.भास्कर मदनकर यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाºया सोयीसुविधांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत केले. अधिकाºयांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे कौैतुक केले.
आयएएस अधिकाऱ्यांनी जाणले ग्रामसभेचे कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:08 PM
आयएएस १८ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील मेंढा गावाला भेट देऊन ग्रामसभेचे कामकाज कसे चालते, याबाबतची माहिती गावकऱ्यांकडून जाणून घेतली.
ठळक मुद्देमेंढा, कारवाफा व सोडे येथे भेट : आयएएस १८ प्रशिक्षणार्थीचा समावेश