शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

पोलीस अधिकारी व शिक्षिकेने दाखविला आदर्शवत प्रामाणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:15 AM

दिवसेंदिवस समाजातील प्रामाणिकपणा लोप पावत चालल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल, पण प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा सुखद अनुभव देणाऱ्या दोन घटना गडचिरोली आणि अहेरी येथे गेल्या दोन दिवसात घडल्या.

ठळक मुद्देदोन घटनांनी दिला सुखद अनुभव : सापडलेल्या मंगळसूत्रासह १० हजार रुपयांची रक्कम संबंधितांना परत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/अहेरी : दिवसेंदिवस समाजातील प्रामाणिकपणा लोप पावत चालल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल, पण प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा सुखद अनुभव देणाऱ्या दोन घटना गडचिरोली आणि अहेरी येथे गेल्या दोन दिवसात घडल्या. यात एका शिक्षिकेने सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र तर एका पोलीस अधिकाऱ्याने एटीएममध्ये मिळालेले १० हजार रुपये संबंधितांना परत करून समाजात प्रामाणिकपणा कायम असल्याचे दाखवून दिले.गडचिरोलीतील आरमोरी मार्गावर असलेल्या एका लॉनवर ७ जानेवारीला प्रज्ञा विष्णू सहारे यांच्या मुलाचा वाढदिवस कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात गडचिरोलीतील विद्याभारती कन्या शाळेत सहायक शिक्षिका असलेल्या प्रतिभा रामटेके सुद्धा गेल्या होत्या. तिथे बाहेर निघताना त्यांना जमिनीवर एक सोन्याचे मंगळसूत्र पडलेले आढळले. जेमतेम एक तोळ्याचे ते मंगळसूत्र त्याच कार्यक्रमात आलेल्या एखाद्या गोरगरीब महिलेचे असावे याचा अंदाज त्यांना आला. भारत स्काऊट गाईडच्या सहायक आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळत असलेल्या रामटेके यांच्यातील गाईडर जागृत झाला. हे मंगळसूत्र ज्याचे आहे त्या महिलेपर्यंत पोहोचावे असा ठाम निश्चय करून त्यांनी दुसºया दिवशी ‘लोकमत’ कार्यालय गाठले. लोकमत सखी मंचच्या सदस्य असल्याने त्यांनी लोकमत कार्यालयात या प्रकाराबद्दल चर्चा केली. त्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस योग्य मदत करू शकतील असा सल्ला मिळाल्यानंतर त्यांनी गडचिरोली ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत मंगळसूत्रधारक महिलेचा शोध घेण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले.परंतू रामटेके त्यानंतरही स्वस्थ बसल्या नाही. वाढदिवसाच्या कार्यक्रमात आलेल्या काही महिलांना त्यांनी माहिती दिली. अखेर सायंकाळी गोकुलनगरात राहणाऱ्या आशा मेश्राम यांनी भ्रमणध्वनीवरून ते आपले मंगळसूत्र असल्याचे रामटेके यांना सांगितले. भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया त्या महिलेला पोलीस ठाण्यात बोलवून खात्री केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांच्या उपस्थितीत ते मंगळसूत्र तिच्या हवाली करण्यात आले.दुसरी घटना अहेरी येथे घडली. चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेल्या एका महिलेन बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममधून ८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी १० हजार रु पयांची रक्कम काढण्यासाठी पूर्ण प्रक्रिया केली. मात्र एटीएममधून लवकर पैसे निघाले नाही. काही वेळ वाट पाहून ती महिला परत निघून गेली. दरम्यान बाहेर उभ्या असलेल्या प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंखे यांनी पैसे काढण्यासाठी एटीएमच्या आत प्रवेश केला असता त्या महिलेची १० हजार रु पयांची रक्कम आणि पैसे काढल्याची पावती एटीएममधून बाहेर निघाली. परंतू ती महिला परत निघून गेली होती. ही बाब साळुंखे यांनी हेल्प्ािंग हँड्सचे सदस्य प्रतीक मुधोळकर, दीपक सुनतकर यांना सांगितली. दुसऱ्या दिवशी (दि.९) बँकेचे व्यवस्थापक गोपाल अकेला यांना संपूर्ण हकीकत सांगितली. एटीएममधून निघालेल्या स्लिपवरून ते पैसे अहेरी प्रकल्प कार्यालयात शिपाई पदावर असलेल्या पुष्पा विलास गेडाम यांचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना बोलवून ते १० हजार रुपये त्यांना परत करण्यात आले. खाकी वर्दीतील प्रामाणिकपणामुळे त्या महिलेचे डोळे पाणावले.

टॅग्स :PoliceपोलिसTeacherशिक्षक