मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीची प्रक्रिया किचकट केली त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. धान साठवणुकीसाठी यावर्षी गुदाम उपलब्ध न झाल्याने धान खरेदी वारंवार बंद झाली. त्यामुळे धान विक्रीपासून अनेक शेतकरी वंचित राहिले. हजारो शेतकऱ्यांनी धान विक्रीकरिता आपला सातबारा दिला आहे. ते आता धान विक्रीची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याकडे काणाडाेळा केला जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. केंद्रावर धानाची विक्री न झाल्यास शेतकऱ्यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी केले आहे.
मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीची मुदत वाढवून न दिल्यास तीव्र आंदाेलन छेडण्यात येईल, असा इशाराही आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी दिला.