शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शूटिंगसाठी ड्राेन वापरणार असाल, तर सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:38 AM

गडचिराेली : लग्नासह विविध कार्यक्रमांची शूटिंग करण्यासाठी ड्राेन कॅमे-यांचा वापर वाढला आहे. मात्र, ड्राेन कॅमे-यांचा वापर करायचा असेल, तर ...

गडचिराेली : लग्नासह विविध कार्यक्रमांची शूटिंग करण्यासाठी ड्राेन कॅमे-यांचा वापर वाढला आहे. मात्र, ड्राेन कॅमे-यांचा वापर करायचा असेल, तर त्याला पाेलीस विभागाची परवानगी आवश्यक आहे. विनापरवानगीने ड्राेनद्वारे शूटिंग केले जात असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल हाेऊ शकतो.

गडचिराेली जिल्ह्यात काही माेजक्याच फाेटाेग्राफरकडे ड्राेन कॅमेरे उपलब्ध आहे. मात्र, एखाद्या फाेटाेग्राफरशी संपर्क साधल्यानंतर संबंधित फाेटाेग्राफर ड्राेन कॅमे-याच्या मालकाशी संपर्क साधून ड्राेन उपलब्ध करून देतो. रात्रीच्या वेळी खुल्या मैदानात रिसेप्शनचा कार्यक्रम असेल, तर ड्राेनचा वापर केला जातो. ड्राेन कॅमेरा एकाचवेळी जवळपास अर्धा किमीवरच्या भागाचे चित्रीकरण करतो. चित्रीकरण करतेवेळी अनेक नागरिकांच्या घरांचेही चित्रीकरण हाेते. त्यामुळे ड्राेन कॅमे-याचा वापर करणार असाल, तर पाेलीस विभागाची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.

बाॅक्स

ड्राेन उडविण्यासाठी लायसन्स हवे

१) ड्रोन उडविण्याकरिता सर्वप्रथम डीजीसीएच्या मान्यताप्राप्त केंद्राकडून आठवडाभराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

२) प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या आधारे ड्रोन उड्डाण करता येऊ शकते.

३) परवाना प्राप्त होईपर्यंत प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती प्रमाणपत्राच्या आधारे ड्रोनचा वापर सुरू ठेवू शकते.

४) विनाप्रशिक्षण, विनापरवाना ड्रोन उडविणे अवैध असून, पोलिसांकडून कारवाईदेखील केली जाऊ शकते.

ड्रोन वापरण्याचेही नियम

१) पाेलीस खात्याशी संबंधित सर्व केंद्रांचा परिसर सुमारे तीन किलोमीटरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला असतो.

२) सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील धरणांच्या परिसरात ड्रोन वापरण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

३) विमानतळाच्या परिसरात तसेच हवाई धावपट्टीच्या भागातसुद्धा ड्रोन वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे.

४) ड्रोनचा प्रकार व ड्रोन उड्डाण करणाऱ्या पायलटची डीजीसीएकडे नोंदणी आवश्यक आहे.

५) नॅनो ड्रोन हा केवळ ५० फूट अर्थातच १५ मीटर उंचीपेक्षा जास्त उडविता येत नाही. तसे केल्यास नियमांचा भंग ठरतो.

६) मायक्रो ड्रोन हा २०० फूट म्हणजेच ६० मीटर उंचावरच उडविता येतो. त्यापेक्षा जास्त उंचीवर उडविणे अवैध ठरते.

असे आहेत ड्रोनचे प्रकार

१) नॅनो २५० ग्रॅमपेक्षा कमी वजन

२) मायक्रो-२५१ ग्रॅम ते २.५ किलोपर्यंत वजन

३) स्मॉल २५ किलोपर्यंत वजन

४) मीडियम २५ ते १५ किलोपर्यंत वजन

५) लार्ज १५० किलोपासून पुढे

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

काेट

काेराेनामुळे व्यवसायावर परिणाम

शाळा, महाविद्यालयांचे सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ, रिसेप्शन आदी कार्यक्रमांसाठी ड्राेनचा वापर वाढायला सुरुवात झाली हाेती. मात्र, काेराेनामुळे मागील दीड वर्षांपासून लग्नवगळता इतर कार्यक्रम बंद आहेत. लग्नही कमी नागरिकांमध्ये आटाेपली जात आहेत. त्यामुळे ड्राेनसह फाेटाेग्राफीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

- सुभाष धंदरे, फाेटाेग्राफर, गडचिराेली