-तर जिल्हाधिकाऱ्यांना घेराव करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:14 AM2018-08-05T01:14:14+5:302018-08-05T01:14:43+5:30
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत विद्यमान केंद्र सरकारच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेण्यात आला. अनेक लाभार्थ्यांनी पदरचे पैसे खर्च करून तर काहींनी उधार, उसणवार करून शौचालयाचे बांधकाम आटोपून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत विद्यमान केंद्र सरकारच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेण्यात आला. अनेक लाभार्थ्यांनी पदरचे पैसे खर्च करून तर काहींनी उधार, उसणवार करून शौचालयाचे बांधकाम आटोपून घेतले. मात्र अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही शेकडो लाभार्थ्यांना शौचालयाच्या अनुदानाची रक्कम मिळाली नाही. येत्या एक महिन्याच्या आत शौचालय लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम न मिळाल्यास काँग्रेस पक्षातर्फे ग्रामस्थांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना घेराव करू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांनी दिला आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी तालुक्याच्या येनापूर, गौरीपूर, आंबोली परिसरात दौरा करून समस्या जाणून घेतल्या. या दौºयादरम्यान माजी आ.डॉ.उसेंडी व इतर पदाधिकाऱ्यांपुढे सदर गावातील शौचालय लाभार्थ्यांनी ही समस्या मांडली. रोवणीसाठीच्या कामाचे पैसे सुद्धा शौचालय बांधकामात खर्च केल्याचे अनेक लाभार्थ्यांनी डॉ.नामदेव उसेंडी यांना सांगितले. केंद्र शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे लाभार्थी शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे, असा आरोप डॉ.उसेंडी यांनी केला आहे. यावेळी चामोर्शी तालुकाध्यक्ष विनोद खोबे, नीलकंठ निखाडे, विश्वास बोरकंठ्ठीवार, नरेश बहादूर, डॉ.कोडापे उपस्थित होते.