लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : रामाळा-मार्र्कंडादेव मार्गावर रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेवर शेकडो ब्रास रेतीचा अवैध साठा करून ठेवण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदारावर महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विद्या आभारे यांनी केली आहे.पावसाळ्यादरम्यान नदीपात्रातून रेतीचा उपसा करता येत नसल्याने काही रेती कंत्राटदार पावसाळ्यापूर्वी रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा करतात. त्यानंतर या रेतीची चढत्या भावाने विक्री केली जाते. रामाळा-मार्र्कंडा मार्गावर रस्त्याच्या अगदी बाजूला रेतीचा ढीग करून ठेवण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य आभारे यांनी पाहणी केली असता, जवळपास १०० ब्रास रेती असल्याचे आढळून आले. सदर रेती नेमकी कुणाची आहे, हे मात्र कळू शकले नाही. रेती मालकाचा शोध घेऊन संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी विद्या आभारे यांनी केली आहे.
रामाळा मार्गावर रेतीचा अवैध साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:47 AM
रामाळा-मार्र्कंडादेव मार्गावर रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेवर शेकडो ब्रास रेतीचा अवैध साठा करून ठेवण्यात आला आहे.
ठळक मुद्देकारवाईची मागणी : विद्या आभारे यांनी केली पाहणी