शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीकडे फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:06 AM

वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत.

ठळक मुद्देशेकडो रोपटे कोमेजली : शासनाच्या आदेशाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत.पर्यावरण संतुलनात झाडांचे अनन्य साधारण महत्त्व असल्याने राज्य शासन राज्यातील विविध विभागांना झाडे लावण्याचे उद्दिष्ट देते. यावर्षी राज्य शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला सुध्दा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. आष्टी परिसरातील इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड करण्यासाठी ३०० रोपटे आणली होती. यातील जवळपास २०० रोपटे लावण्यात आले. उर्वरित १०० रोपटे इल्लुर येथील समाज मंदिरासमोर बेवारस स्थितीत पडून आहेत. ये-जा करणारी जनावरे रोपटे खात असल्याने यातील काही रोपटे करपली आहेत. अगदी समाज मंदिराच्या पायऱ्यांसमोर रोपटे पडून आहेत.एकीकडे शासन प्रत्येक झाड जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे इल्लुर ग्रामपंचायतीचे प्रशासन शासनाच्या उद्देशाला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. ही सर्वच रोपटे खरेदी करून आणली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे पैसे वाया गेले आहेत. सदर रक्कम ग्रामपंचायतीचे सचिव, सरपंच व इतर कर्मचाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी इल्लुर येथील नागरिकांकडून होत आहे. तसेच शासन आदेश धुडकाविणाऱ्या सचिवावरही कारवाईची मागणी आहे.जनतेच्या पैशाचा अपव्ययवृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक झाड खरेदी करावे लागते. वृक्ष लागवडीसाठी शासन ग्रामपंचायतीला एकही पैसा देत नाही. वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतीला स्वत:च्या निधीतून खर्च करावा लागतो. नागरिक पदरमोड करून ग्रामपंचायतीकडे कराचा भरणा करतात. नागरिकांचा हा पैसा सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांच्या दुर्लक्षामुळे असा वाया जात आहे. त्यामुळे याची चौकशी करून कारवाईची मागणी आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत