अशोक नेते यांच्या सूचना : विभागीय कार्यालयात घेतली रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठकगडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकावरील दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करून ते मार्गी लावावे, वडसा रेल्वे स्थानकावर अंडब्रिज लेव्हल क्रॉसिंगचे तसेच ब्रह्मपुरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅफार्मची उंची वाढविण्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना खा. अशोक नेते यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दक्षिण पूर्ण मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय कार्यालयात २० आॅक्टोबर रोजी गुरूवारला रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला आमगाव क्षेत्राचे माजी आ. पेरसिंग नागपुरे, भाजपचे पदाधिकारी संजय गजपुरे, होमदेव मेश्राम, घनश्याम अग्रवाल तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी. सी. अहीर, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक अर्जुन सिब्बल, वरिष्ठ मंडल प्रबंधक सचिन शर्मा, रेल्वेचे मुख्य अभियंता (बांधकाम) ए. के. पांडे, रेल्वेचे अधिकारी पात्रा, आर. के. दुबे, आर. ए. हांडे, व्ही. व्ही. सुब्बाराव, पी. व्ही. व्ही. सत्यनारायण, वाय. एम. राठोड आदी उपस्थित होते. वडसा-गडचिरोली या नव्या रेल्वे लाईनच्या बांधकामासाठी भूमी अधिग्रहणासंबंधी विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सदर रेल्वे मार्ग मार्गी लावण्यासाठी भूमीअधिग्रहणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना खा. नेते यांनी दिल्या.याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी दक्षिणपूर्व मध्य रेल्वे विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती खा. नेते यांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)बसथांबा देण्यावरही झाली चर्चासिकंदराबाद एक्सप्रेसचा थांबा नागभिड येथे देण्यात यावा, तसेच दुरांतो एक्सप्रेसचा थांबा गोंदिया येथे तर जनशताब्दी एक्सप्रेसचा थांबा आमगाव व सालेकसा येथे देण्यात यावा, या मागणीवरही बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. नागभिड रेल्वे स्टेशनवर फुटओवर ब्रिजमध्ये सुधारणा तसेच सिंदेवाही येथील ओव्हरब्रिजच्या कामाबाबतही आढावा घेण्यात आला. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना खा. नेते यांनी दिल्या. केलेल्या कार्यवाहीचा अहवालही सादर करावा, असे त्यांनी निर्देश दिले.
रेल्वे स्थानक दुरूस्तीची कामे तत्काळ करा
By admin | Published: October 23, 2016 1:35 AM